ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

शेतकरी आंदोलनात फूट, २ संघटनांची माघार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 27, 2021 07:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शेतकरी आंदोलनात फूट, २ संघटनांची माघार

शहर : देश

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनातल्या हिंसाचारासानंतर व्ही. एम.सिंग यांच्या शेतकरी संघटनेनं आंदोलनातून माघार घेतल्याची घोषणा केली आहे. भारतीय किसान युनियन म्हणजे भानू या संघटनेचे व्ही. एम. सिंग प्रमुख आहेत. भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला. हे अतिशय क्लेषदायक असल्याचंही व्ही.एम. सिंग यांनी म्हटलं आहे. हे आंदोलन हाताळण्यात सरकारनंही चूक केल्याचा आरोप सिंग यांनी केला आहे.

व्ही एम सिंग यांनी शेतकरी आंदोनातून माघार घेतल्यानंतर आता आंदोलनात फूट पडली आहे. सिंग यांच्यासह 2 संघटनांची माघार घेत असल्याचं म्हटलं आहे.

२६ जानेवारी रोजी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड येथे झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर शेतकरी संघटनांमध्ये आता मोठी फूट पडली आहे. बुधवारी, गाझीपूर सीमेवरील तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी आंदोलन करणारे व्हीएम सिंग (राष्ट्रीय शेतकरी चळवळ संघटनेचे प्रमुख) यांनी घटनेचा निषेध करत आंदोलनातून माघाराची घोषणा केली. दिल्ली आणि नोएडा येथे सीमेवर धरणे आंदोलन करणाऱ्या  भानू गटानेही आता माघार घेतली आहे.

कालचा प्रजासत्ताक दिन हा अनेक अर्थांनी वेगळा होता. कारण एकीकडे दिल्लीतल्या राजपथावर प्रजासत्ताक दिन साजरा झाला आणि दिल्लीच्या सीमांवर असलेले हजारो आंदोलक शेतकरी ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्लीत शिरले. तिथून सुरू झाला राडा. आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठी हल्ले केले, अश्रूधुराचा मारा केला, तर काही आंदोलकांनी थेट ट्रॅक्टर पोलिसांवर चढवण्याचा प्रयत्न केला.

काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावरच धावा केला. तिथं निशाण साहीबचा झेंडा फडकवला. दिवसभर धुमश्चक्री सुरु होती. यामुळं कालचा गणतंत्र दिवस होता की रणतंत्र दिवस असा प्रश्न पडला. पण मुळात मागच्या 62 दिवसांपासून शांततेत शिस्तबद्ध आंदोलन करणारे आंदोलक शेतकरी काल हिंसक का झाले, की हिंसा करणारे आंदोलक हे शेतकरीच नव्हते? सुरुवातीला शेतकऱ्यांवर लावलेला खलिस्तानीचा टॅग खरा करण्यासाठी काल कुणी प्रयत्न केले का, कालच्या आंदोलनानं 62 दिवसांच्या आंदोलकांच्या मेहनतीवर पाणी फेरलं का? कालच्या हिंसेनंतर आता शेतकरी संघटनांच्या प्रतिमेला फटका बसलाय का, की केंद्र सरकार ही परिस्थिती हातळण्यात कमी पडलं ? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

        

मागे

दिल्ली हिंसाचाराला जबाबदार कोण? राकेश टिकैत? दीप सिद्धू? लक्खा सिधाना?
दिल्ली हिंसाचाराला जबाबदार कोण? राकेश टिकैत? दीप सिद्धू? लक्खा सिधाना?

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी दिल्लीत शेतकऱ्यांनी ट्र....

अधिक वाचा

पुढे  

संतप्त शेतकऱ्यांकडून लालकिल्याची नासधूस, हिंसाचाराला जबाबदार कोण ?
संतप्त शेतकऱ्यांकडून लालकिल्याची नासधूस, हिंसाचाराला जबाबदार कोण ?

शेतकऱ्यांचं कालचं रौद्र रुप संपूर्ण देशाने पाहिलं. प्रजासत्ताक दिनी लालकि....

Read more