ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या; मुंबई पालिकेचे भावा-बहिणींना आवाहन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 09, 2020 12:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑनलाईनच ओवाळा, ऑनलाईनच ओवाळणी द्या; मुंबई पालिकेचे भावा-बहिणींना आवाहन

शहर : मुंबई

राज्यात आलेली थंडीची लाट आणि कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने दिवाळीनिमित्त फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली आहे. त्यानुसार मुंबईत फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली असून भावा-बहिणींनाही भाऊबीज घरातूनच ऑनलाईन पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मार्केटमध्ये मुंबईकरांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने महापालिकेने आज तातडीने दिवाळी निमित्ताने नियमावली जारी करून फटाके फोडण्यास मज्जाव केला आहे. तसेच भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्यतो दृकश्राव्य प्रणालीद्वारे ओवाळावे, तर भावाने देखील शक्यतो ऑनलाईन पद्धतीनेच ओवाळणी द्यावी, अशी सूचनाही पालिकेने केली आहे.

दरवाज्यात पाण्याने भरलेली बादली ठेवा

महापालिकेने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या नियमावलीतून छोट्याछोट्या गोष्टींवरही लक्ष केंद्रीत केलं आहे. यंदाच्या दिवाळीत दारापुढे रांगोळी काढताना आणि पणत्या लावताना त्यासोबत पाण्याने भरलेली बादली आणि साबण दरवाज्यात ठेवण्यास सांगण्यात आलं असून हातपाय, चेहरा धुऊनच घरात प्रवेश करण्याचे निर्देश पालिकेने दिले आहेत. तसेच सॅनिटायजर हे ज्वालाग्रही असू शकते, ही बाब लक्षात घेऊन दिवाळीच्या निमित्ताने दिवे लावताना सॅनिटायजरचा वापर करू नका, अशी सूचनाही पालिकेने केली आहे.

हॉटेल, जिमखाना परिसरातही फटाके फोडण्यास बंदी

मुंबईतील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही. तसेच हॉटेल, क्लब, जिमखाना, संस्था, व्यवसायिक परिसर, विविध समूह इत्यादींद्वारे आणि त्यांच्याशी संबंधित परिसरांमध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी आणि त्या संबंधीचे कार्यक्रम करता येणार नाहीत, असंही पालिकेने नमूद केलं आहे.

फटाके फोडताना सॅनिटाजरचा संपर्क टाळा

दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतशबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. सदर प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली अगर कुपी आपल्याजवळ बाळगू नये, असंही या निर्देशात म्हटले आहे.

फराळासाठी नातेवाईकांच्या घरी जाऊ नका

दिवाळीच्या काळात फराळासाठी परिचितांच्या / नातेवाईकांच्या घरी जाणे टाळावे. दिवाळीच्या शुभेच्छा या दूरध्वनीद्वारे वा दृकश्राव्य प्रणालीद्वारे द्याव्यात, असंही पालिकेने म्हटलं आहे.


मागे

व्हाईट हाऊस सोडताच मेलानिया ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार, अमेरिकन मीडियाचा दावा
व्हाईट हाऊस सोडताच मेलानिया ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देणार, अमेरिकन मीडियाचा दावा

अमेरिकेच्या निवडणुकीत जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. ....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी, फक्त लक्ष्मीपूजनाला फुलबाजांना परवानगी
मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी, फक्त लक्ष्मीपूजनाला फुलबाजांना परवानगी

अवघ्या काही दिवसांवर दिवाळी सण आल्याने मुंबईतील मार्केटमध्ये खरेदीसाठी म....

Read more