By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2019 04:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : बेळगाव
स्वत:चे चार चाकी वाहन असणाऱयांनी बीपीएल कार्ड मिळविले असल्यास त्यांची कार्डे रद्द करण्यात येणार आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने अशा कार्डधारकांचा शोध घेण्यासाठी आरटीओ आयुक्तांकडून संबंधित व्यक्तींची माहिती देण्याचे कळविले आहे. यामुळे आरटीओंकडून अशा व्यक्तींची संपूर्ण माहिती अन्न व नागरी पुरवठा खात्याला मिळणार आहे.
याबरोबरच शहर परिसरात 1 हजार चौरस फुटापेक्षा जास्त जागेत पक्के घर असणाऱया कुटुंबीयांनाही बीपीएल रेशनकार्ड घेता येणार नाही. यामुळे अशा कुटुंबीयांचा शोधही खात्याच्यावतीने घेण्यात येत आहे. यासाठी महापालिका आयुक्तांकडून अन्न व नागरी पुरवठा खात्याच्यावतीने पत्राद्वारे माहिती मागविण्यात आली आहे. शहर परिसरात 1 हजार चौरस फुटापेक्षाही अधिक जागेत घर असल्यास अशा कुटुंबीयांची माहिती देण्यात यावी, असे पत्रकाद्वारे कळविले आहे. यापुढे चार चाकी वाहन असणाऱया तसेच 1 हजार चौरस फुटापेक्षाही अधिक जागेत घरे असणाऱया आणि बीपीएल कार्ड मिळविलेल्या कुटुंबीयांची माहिती मिळविण्यात येणार आहे.
राज्यात अपात्र लाभार्थींकडून रेशनकार्डाचा दुरुपयोग होत असल्याने तांदळाचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने ठोस भूमिका घेतली आहे. त्याकरिता अन्न आणि नागरी पुरवठा खात्याने यापूर्वीच संबंधित कार्यालयांमध्ये अपात्र लाभार्थींना स्वतःजवळील बीपीएल रेशनकार्डे जमा करण्याची सूचना दिली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केलेल्यांचा शोध घेण्यासाठी खाते वेगवेगळय़ा मार्गांचा अलवंब करीत आहे
दिवाळी म्हंटली की, फटाख्यांची आतीषबाजी आलीच. परंतु यावेळी भरपूर फटाखे उडवू....
अधिक वाचा