ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बेरोजगारीमुळे उस्मानाबादच्या तरुणांना कर्नाटकमध्ये शोधावी लागते वधू...

By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 17, 2019 10:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बेरोजगारीमुळे उस्मानाबादच्या तरुणांना कर्नाटकमध्ये शोधावी लागते वधू...

शहर : सोलापूर

उस्मानाबाद जिल्ह्यातील कौडगाव या गावात किमान शंभर मुल लग्नाच्या वयाची असतील. पण गावात भीषण दुष्काळ आणि त्यात रोजगाराच्या संधीही नाहीत. ग्रामस्थांच्या ज्या जमिनी होत्या, त्या देखील एमआयडीसीसाठी गेल्या आहेत. अशा संकटात सापडलेल्या या गावातील तरुणांची लग्न ठरत नाही. त्यामुळे या गावातील तीन तरुणांनी अखेर कर्नाटकमधील मुलींशी लग्न केले.

उस्मानाबाद जिल्ह्यात राहणारे उद्यकुमार थोरात हे गावातील तरुणांची लग्न ठरत नाहीत, असे सांगतात. मुलाला पाहण्यासाठी मुलीकडचे येतात. मात्र, पुन्हा पुढील बोलणी करण्यासाठी येत नाही. दुष्काळामुळे या गावात कोणीच मुलगी देण्यास तयार नाहीत, असे त्यांनी सांगितले.  सध्या गावात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे तरूणांना रोजगार नाही. पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांसाठी चारा विकत आणावा लागत आहे. दर दोन वर्षांनी गावाला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. कौडगाव म्हणजे दुष्काळ असे समीकरणच झाल्याचे त्यांनी सांगितले.  आमच्या जमिनी एमआयडीसीसाठी गेल्या आहेत. येथे कारखाने होणार असल्याची स्वप्न आम्हा गावकऱ्यांना दाखवण्यात आली. जमिनी ताब्यात घेतल्या. याला सात ते आठ वर्षे झाली, मात्र अच्छे दिन आलेच नाहीत. याठिकाणी उद्योग तर कोणताच नाही. नेमकं कारण काय? कशामुळे? शासनाची अशी उदासिनता का आहे? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला. गावात भूमीहिन शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. त्यांची परिस्थिती सरकारला काय माहित? येथील तरूणांची लग्न ठरत नाहीत. कर्नाटकमध्ये सोयरीक जुळवावी लागतेय.  शासनाने आम्हाला धर्मसंटात टाकले आहे. नोकऱ्यांची अश्वासने फोल ठरली आहेत. गावांतील युवकांची बेकारी वाढल्यामुळे युवक दिशाहीन अवस्थेकडे गेला असल्याचे थोरात म्हणाले.

मागे

यंदा हापूस नैसर्गिक संकटात...
यंदा हापूस नैसर्गिक संकटात...

फळांचा राजा म्हणजे 'हापूस' यंदा नैसर्गिक संकटात सापडला आहे. वाशीतील एपीए....

अधिक वाचा

पुढे  

राज्यात विज कोसळून दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू
राज्यात विज कोसळून दोन दिवसांत 7 जणांचा मृत्यू

गेल्या दोन दिवसामध्ये अवकाळी पाऊस आणि विज कोसळल्यामुळे 7 जणांचा मृत्यू झाल....

Read more