ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

बीएसएनएलच्या 22 हजार कर्मचार्यांहच्या स्वेच्छानिवृतीसाठी अर्ज

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2019 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बीएसएनएलच्या 22 हजार कर्मचार्यांहच्या स्वेच्छानिवृतीसाठी अर्ज

शहर : देश

भारत संचार निर्गम लि.(बीएसएनएल) ने आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती योजना (व्हीआरएस) जाहीर केली असून 3 डिसेंबरपर्यंत त्यासाठी कर्मचार्‍यांना अर्ज करता येणार. योजना जाहीर केल्यानंतर अवघ्या दोन दिवसात 22 हजार कर्मचार्‍यांनी व्हीआरएससाठी अर्ज केल्याची माहिती एका वरिष्ठा अधिकार्‍याने दिली.

सध्या बीएसएनएलमध्ये दीड लाख कर्मचारी येतात. त्यापैकी 1 लाख कर्मचारी व्हीआरएस योजनेत 70 ते 80 हजार कर्मचारी पात्र ठरण्याची शक्यता आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलला केंद्र सरकारने मदत करण्याची घोषणा केली होती. त्याला एक आठवडा होतो न होतो तोच बीएसएनएलने स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर केली होती. या योजनेचा 77 हजार कर्मचारी लाभ घेतील अशी शक्यता. 4 नोव्हेंबरपासून ही योजना सुरू झाली असून 3 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख आहे. 70 ते 80 हजार कर्मचार्‍यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली तर कंपनीच्या वेतन खर्चात वर्षाला 7 हजार कोटींची बचत शक्य होणार.

या योजनेनुसार वयाची 50 वर्षे कोणवा त्याहून अधिक वयोगटातील कर्मचारी अर्ज करू शकतील. त्यांना सानुग्रह अनुदानपोटी मिळणार्‍या रकमेत अधिक लाभ मिळेल. हा लाभ एक रकमी रोखीच्या स्वरुपात किंवा पाच हप्त्यात विभागून मिळणार आहे. सेवेत कार्यात वर्षाच्या 35 दिवसांइतकी आणि शिल्लक राहिलेल्या सेवेच्या वर्षातील 25 दिवसांचा  वेतना इतकी रक्कम (निवृत्ती वगळून) सानुग्रह अनुदान मिळणार आहे. ज्या कर्मचार्‍यांचे वय 56 असेल त्यांना शिल्लक राहिलेल्या चार वर्षांचे वेतन किंवा 40 महिन्यांचे वेतन मिळणार. पेन्शन व राजेबाबतही लागू असलेले भत्ते या योजनेत मिळणार आहेत.

मागे

आज दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता
आज दिवसभर पाऊस राहण्याची शक्यता

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळे नोव्हेंबरमध्येही पावस....

अधिक वाचा

पुढे  

माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन
माजी पोलिस महासंचालक अरविंद इनामदार यांचे निधन

माजी पोलिस महासंचालक व उत्तर प्रदेश राज्यपालांचे सल्लागार म्हणून आपल्या क....

Read more