ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Budget 2020 : बँक डुबली तर ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2020 03:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Budget 2020 : बँक डुबली तर ग्राहकांना मिळणार पूर्वीपेक्षा जास्त पैसे

शहर : देश

बॅंक घोटाळ्यांच्या बातम्या आल्यानंतर बँकांवर आरबीआय निर्बंध लादते. त्यामुळे सामान्य माणसांना आर्थिक अडणींना सामोरे जावे लागते. निर्बंध लादल्यामुळे सामान्यांना आपले हक्काचे पैसे काढता येत नाही. त्यावर मर्यादा येतात. त्यामुळे आता बँक बुडीत गेली किंवा डुबली तर तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त पैसे मिळणार आहेत. त्यामुळे बँकांमध्ये ठेवलेले पैसे आता अधिक सुरक्षित होणार आहेत.

गेल्या काही दिवसांमध्ये अचानक बँका बंद झाल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने यावर उपाय म्हणून ही तयारी केली आहे. आता सर्व सार्वजनिक खासगी बँक बंद झाल्यावर विमा अंतर्गत पाच लाख रुपये मिळणार आहेत. आतापर्यंत अस्तित्त्वात असलेल्या नियमांनुसार बँक बंद केल्यावर केवळ एक लाख रुपये मिळत होते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात जाहीर केले की सार्वजनिक आणि खासगी दोन्ही बँकांमध्ये ग्राहकांचे पैसे सुरक्षित करणे ही सरकारची प्राथमिकता आहे.

 १० सरकारी बँका चार बँकांमध्ये विलीन होणार

केंद्र सरकार देशात सध्या अस्तित्त्वात असलेल्या १० बँकांच्या विलीनीकरण करणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थमंत्री सीतारामण यांनी त्याबाबत घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दहा बँका चार प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये विलीन होतील. आयडीबीआय बँकेचे निर्गुंतवणूक करण्यात येणार आहे. केंद्र सरकार हळूहळू आयडीबीआय बँकेतील हिस्सेदारी विक्री करणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ही सरकारी बँकेने बॅड लोन दिल्याने वसुलीसाठी झगडावे लागत आहे.

बँकांसाठी केंद्रीय अर्थ मंत्रालयाची ही घोषणा

- सरकारी बँकांची अवस्था ठीक आहे, ग्राहकांचे पैसे सुरक्षित आहेत

- सिडबी बँकेसह अॅक्सिस बँक १००० कोटींची योजना आणणार आहे

- आयडीबीआय बँकेचा हिस्सा हळूहळू विकला जाणार आहे

- बँक बुडली तर पाच लाख मिळतील

- खासगी बँकांमध्ये देखरेखीचे कठोर नियम ग्राहकांच्या ठेवी भांडवलासाठी लागू असतील

- जम्मू-काश्मीरच्या केंद्र शासित प्रदेशासाठी ३०,७५७ कोटी रुपये दिले जातील

अर्थसंकल्पात काय?

वॉटरवेज -: गेल्या वर्षांत जलविकास मार्ग पूर्ण करणार२०२२ पर्यंत आसाम सर्व बंदरांचा विकास करणार

इलेक्ट्रसीटि

स्मार्ट मीटर सुरु करणार

स्मार्टमीटरने सध्याची प्रणाली बदलणार त्यामुळे ग्राहकांना सप्लायर आण रेट निवडण्याची मुभा मिळणार

अक्षय उर्जासाठी

नॅशनल गॅस ग्रीड सुरु करणार

गॅस ग्रीड लाईन २७००० किमीपर्यंत विस्तारणार

नवी अर्थव्यवस्था

आर्टिफिशयल इंटलिजन्स

खासगी क्षेत्राच्या मदतीने डेटा सेंटर पार्क उभारणार, त्यासाठी विधेयक आणू,

तेलाच्या शोधासाठी प्रयत्न करणार

१०० हजार ग्रामपंचायत फायबर (एफटीटीएचने ) भारत नेट ने जोडणार

भारत नेट कार्यक्रमासाठी ६००० कोटींची तरतूद

नॅशनल लेव्हल सायन्स स्कीम

नॅशनल क्वॉंटम टेक्नॉलाडीसाठी

बेटी बचाव बेटी पढावला चांगला प्रतिसाद मिळतोय.

मुलांपेक्षा मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण वाढलंय

इतर

६लाखांहून अधिक अंगणवाडी सेविकांकडे मोबाईलफोन

स्मार्टफोनमुळे अंगणावाडी सेविकांचं काम सुधारलं

पोषण अभियानासाठी ३५००० कोटींची तरतूद

महिलांच्या योजनांसाठी २८६०० कोटींची तरतूद

 

उडान स्किम अंतर्गत १०० नवी विमानतळ  बांधणार

एससी आणि इतर मागासवर्गीयांसाठी ८५००० कोटींची तरतूद २०२०-२१

५३७०० कोटी एसटींसाठी

दिव्यांगांसाठी ९५००० कोटींची तरतूद

कल्चर आणि टुरिझम

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टुरिझम बनवणार

पुरातत्व केंद्र विकसित करणार (शिबसागर, हस्तिनापूर,धौलगिरी, राखीगढी)

सिंधु सरस्वती मॅरिटाईम साईट अहमदाबादजवळ उभारणारा त्यासाठी

राज्य सरकारांनी अशा विशेष पर्यटनस्थळांसाठी आराखडा तयार करावा

संग्रहालयांचा जीर्णोद्धार करणार

सांस्कृतिक मंत्रालयाला ३१०० कोटी

झारखंडमध्ये आदिवासी संग्रहालय

मागे

वडिलांचे निधन झाले तरी अधिकारी ६ दिवस कार्यालयातच अडकले
वडिलांचे निधन झाले तरी अधिकारी ६ दिवस कार्यालयातच अडकले

           नवी दिल्ली : काही बाबतीत नियम इतके कठोर असतात की, अशावेळी भाव....

अधिक वाचा

पुढे  

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या सहाय्याने तक्रार दाखल करता येणार
व्हिडीओ कॉन्फरन्सच्या सहाय्याने तक्रार दाखल करता येणार

       सांगली : तक्रार निवारण दिवशीच १ फेब्रुवारीला व्हिडीओ कॉन्फरन्स....

Read more