ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

बुलढाण्यात 2 चिमुकल्याचा कार मध्ये गुदमरून मृत्यू

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 16, 2019 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

बुलढाण्यात 2 चिमुकल्याचा कार मध्ये गुदमरून मृत्यू

शहर : बुलढाणा

सोमवारी दुपारपासून बुलढाणा शहरातील बेपत्ता असलेली 3 लहान मुले एका बंद कार मध्ये आढळली. धक्कादायक म्हणजे यापैकी दोन मुलांचा गुदमरून मृत्यू झाला तर सहर शेख हमीद  नावाची चार वर्षाची चिमूरडी जीवंत सापडली.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, आहील शेख (वय 5) आजिम शेख (वय 3) आणि सहर शेख (वय 4) ही तीन मूल  काल अंगनवाडीत गेली होती. पॅन ती दुपार पासून बेपत्ता झाल्याचे लक्षात येताच त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात आला. पन ती सापडली नाहीत. तेव्हा ही मुले हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली. आज खंडग्रास चंद्रग्रहण असल्याने नरबळी साठी  या मुलांचे अपहरण झाले असावे, अशीही भीती व्यक्त करण्यात येत होती. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील प्रत्येक घराची तपासणी सुरू केली. त्यावेळी टिपू सुल्तान चौकसमोरील गवळी पुरला लागून असलेल्या एका घरासमोर लाल रंगाची कार उभी होती. पोलिसांना संशय आला. म्हणून पोलिसांनी काचेतून कार मध्ये डोकावून पाहिले आणि काचेवर ठोकले. तेव्हा 4 वर्षाची सहर उठून बसली. तत्काळ पोलिसांनी कारचे दरवाजे उघडले . तर आणि दोन मुले बेशुद्ध अवस्थेत आढळले . पोलिसांनी तातडीने तिघांनाही जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी साहिल आणि आजिम शेख यांना मृत घोषित केले.

मागे

बालाकोट एअर स्ट्राईकनंतर केलेली हवाई बंदी पाकने हटवली.
बालाकोट एअर स्ट्राईकनंतर केलेली हवाई बंदी पाकने हटवली.

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात भारतीय विमानांना अ....

अधिक वाचा

पुढे  

 कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आज निकाल
 कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आज निकाल

हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नौदलाचे निवृ....

Read more