By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 04:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पालघर
सफाळे जवळील मांडे येथील ग्रामस्थांनी बुलेट ट्रेन प्रकल्पासी संयुक्त मोजणी करणार्या अधिकार्यांना पिटाळून लावत मोजणी हाणून पाडली. या संयुक्त मोजणीला गावकरी आणि भूमिपुत्रांनी जोरदार विरोध केला .
पालघर जिल्ह्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध असून ही मोजणीच बेकायदेशीर असल्याचे ग्रामस्थाचे म्हणणे आहे. मांडे गावचा ग्रामसभेने बुलेट ट्रेन विरोधी ठराव यापूर्वीच शासनाला सादर केला आहे. तरीही मोठा पोलिस फाटा घेऊन बुलेट ट्रेनच्या संयुक्त मोजणी साठी अधिकारी भात शेतीची कामे करीत असलेल्या गावकर्यांच्या जमिनीत दाखल झाले आणि त्यांनी मोजणी करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे गावकरी संतापले. त्यांनी या मोजणीला जोरदार विरोध केला. परिणामी अधिकार्यांना काम थांबवावे लागले.
मंगळवारी मॅंचेस्टर येथे विश्वचषकातील भारत न्यूझीलंड सघदरम्यान पहिल्या उप....
अधिक वाचा