ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

समुद्रात गाडी धुणे पडले महागात

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 05:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

समुद्रात गाडी धुणे पडले महागात

शहर : रत्नागिरी

             रत्नागिरी - समुद्राच्या पाण्यात गाडी धुण्याचा अतिउत्साही पर्यटकाचा प्रयत्न त्याला चांगलाच महागात पडला आहे. पुण्याच्या चालकाने धुण्यासाठी नेलेले ही टेम्पो ट्रव्हलर  समुद्राच्या भरतीमुळे रात्रभर पाण्यातच फसली. अखेर सकाळी जेसीबीच्या साहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात यश आले, यात इंजिन निकामी झाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सहा वर्षापूर्वी डिसेंबर 2013 मध्ये घडलेल्या प्रकाराची पुनरावृत्ती यावेळी पाहायला मिळाली.


           पुणे येथील काही पर्यटक मंगळवारी दुपारी आंजर्ले-ब्राम्हणवाडी येथे पर्यटनासाठी आले होते. दुपारचे जेवण आटोपल्यावर चालकाने आपली टेम्पो टॅव्हलर धुण्यासाठी चक्क समुद्राचा पर्याय निवडला. समुद्राचे पाणी खारे असल्याने त्यात गाडी धुवा नका असा सल्ला ग्रामस्थांनी या चालकाला दिला. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत चालक टेम्पो ट्रव्हलर घेऊन समुद्राच्या पाण्यामध्ये गेला. यावेळी तेथे चालकाशिवाय अन्य कोणीही नव्हते.


           गाडी धुवत असताना हळूहळू समुद्राला भरती सुरू झाली. मात्र समुद्राची काहीच माहिती नसल्याने चालकाला सुरूवातीला याबाबत काहीच कल्पना आली नाही. मात्र भरतीमुळे गाडी वाळूमध्ये रूतायला लागल्याने घाबरलेल्या चालकाने गाडी पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न फोल ठरला. त्यामुळे आपणही वाळूत रूतू या भितीने चालकाने गाडी तेथेच सोडून किनाऱयाच्या दिशेने पळ काढला. मात्र तोपर्यंत खूपच अंधार झाल्याने मदत करणे शक्य नव्हते. त्यामुळे रात्रभर ही गाडी पाण्यातच राहीली.


         बुधवारी सकाळी वाहनचालक व पर्यटकांनी ग्रामस्थांच्या मदतीने एका जेसीबीच्या सहाय्याने समुद्राच्या पाण्यामध्ये रात्रभर असणारी गाडी बाहेर काढली. ही गाडी बाहेर तर निघाली मात्र समुद्राच्या पाण्यात राहील्याने टेम्पो ट्रव्हलरचे इंजिन खराब होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुण्यातील या पर्यटकांची घोर निराशा झाली असून पश्चातापाची वेळ चालकावर आली.


         2013 साली डिसेंबर महिन्यात असाच प्रकार घडला होता. त्यावेळी समुद्राजवळच गाडी लावून पर्यटक किनाऱयावर विसावले होते. अशावेळी भरती आल्याने या पर्यटकांची गाडी वाहून गेली होती. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने ती बाहेर काढण्यात आली होती. 6 वर्षापुर्वीच्या घटनेच्या आठवणी त्यामुळे ताज्या झाल्या.
 

मागे

एस. टी. सवलतीसाठी गोलमाल केलेली २५ आधारकार्ड जप्त
एस. टी. सवलतीसाठी गोलमाल केलेली २५ आधारकार्ड जप्त

          राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ‘स्मार्ट कार्ड&r....

अधिक वाचा

पुढे  

एसबीआयच्या खेर्डी शाखेतून कोट्यवधीचे कर्ज काढून कुटुंब फरार
एसबीआयच्या खेर्डी शाखेतून कोट्यवधीचे कर्ज काढून कुटुंब फरार

          चिपळूण - बँक मॅनेजरला हाताशी धरून कोटय़वधीचे कर्ज काढून संपूर्....

Read more