ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोविड रुग्णालयात तरूणीचा विनयभंग; संक्रमित डॉक्टरवर आरोप

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 09:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोविड रुग्णालयात तरूणीचा विनयभंग; संक्रमित डॉक्टरवर आरोप

शहर : देश

कोविड रुग्णालयांमध्ये महिलांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं चित्र वारंवार समोर येत आहे. कोविड रुग्णालयात दिल्ली विद्यापीठाच्या  (Delhi University) विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची खळबळजनक बाब समोर येत आहे. ताजी घटना दिल्लीला लागून असलेल्या नोएडामधील जेपी रुग्णालयातील आहे. एका तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी  संक्रमित डॉक्टरवर आरोप दाखल करण्यात आला आहे.

संबंधीत तरूणीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान बाजूच्याच बेडवर दाखल असलेल्या ३५ वर्षीय डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप तरूणीने केला आहे. त्यामुळे बहरहाल पोलिसांनी तरूणीच्या तक्रारीवरून डॉक्टरविरोधात भादंवि कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.सांगण्यात येत आहे की, २० जुलै रोजी तरूणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर २३ जुलै रोजी संक्रमित डॉक्टर अमृत गोयलला देखील उपचारासाठी त्याच वार्डमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र तरूणीने आरोप केल्यानंतर डॉक्टरला दुसऱ्या वॉर्डमध्ये हलवण्यात आलं आहे.

डॉक्टरवर कोरोनाचे उपचार सुरू असल्यामुळे त्याला अटक करण्यात आलेली नाही. मात्र डॉक्टरची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

 

मागे

कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी न करण्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं आवाहन
कोरोनामुळे यंदा दहीहंडी साजरी न करण्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं आवाहन

यंदा देशात कोरोनाचं सावट असल्याने एकत्र येणं कठीण झालं आहे. देशात कोरोनाचा ....

अधिक वाचा

पुढे  

SSC Result 2020 | दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, एसएससी बोर्डाचा निकाल अवघ्या काही तासात
SSC Result 2020 | दहावीच्या विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली, एसएससी बोर्डाचा निकाल अवघ्या काही तासात

दहावीच्या विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला आणणारा एसएससी बोर्डाचा निका....

Read more