ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

संरक्षण : केंद्र सरकारने ऑफसेट पॉलिसी केली रद्द, खरेदी व्यवहारांत नवे धोरण

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 05:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संरक्षण : केंद्र सरकारने ऑफसेट पॉलिसी केली रद्द, खरेदी व्यवहारांत नवे धोरण

शहर : देश

संरक्षण विषयक खरेदी व्यवहारांबाबत केंद्र सरकारने नवे धोरण जाहीर केले आहे. दुसऱ्या देशांच्या सरकारशी होणाऱ्या करारामध्ये भारतात गुंतवणूक करण्याची अट म्हणजेच ऑफसेट धोरण रद्द करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. ऑफसेटची अट फारशी यशस्वी होत नसल्याने ती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या धोरणामुळे युद्धसामग्रीचे तंत्रज्ञान मिळवण्यापेक्षा सुसज्ज युद्धसामग्री खरेदी केली जाऊ शकेल. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज युद्धसामग्री मिळवण्यावर भर असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. कुचकामी ऑफसेट धोरणाबद्दल कॅनने सरकारवर ताशेरे ओढल्यावर आता सरकारने ऑफसेट धोरणच निकाली काढले आहे.३०० कोटींहून अधिक संरक्षण खरेदीचा करार असेल तर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात कराराच्या ३० टक्के रक्कम गुंतवण्याची अट होती. यात सुट्टे भाग, तंत्रज्ञान हस्तांतरण, तंत्रज्ञान आणि शोध फॅसिलिटी यात गुंतवणूक अपेक्षित होती. कॅगने ताशेरे ओढताना राफेलचं नाव घेतले आहे.५९ हजार कोटींच्या राफेल खरेदीनंतरही दसॉल एव्हिएशन असेल नाही तर क्षेपणास्त्र निर्मिती करणारी एमबीडीए, या दोन्ही कंपन्यांनी अजूनही भारतात गुंतवणूक केली नाही. राफेल करारात तर ५० टक्के गुंतवणुकीचा मुद्दा होता. मात्र आता सरकारने नवा निर्णय जाहीर करत ऑफसेटचा मुद्दाच रद्दबातल केला आहे. आता केवळ निविदा काढून करार झाले तरच ऑफसेट लागू असेल.

 

मागे

विमा कंपनी मनमानी पद्धतीने क्लेम रद्द करू शकत नाही !
विमा कंपनी मनमानी पद्धतीने क्लेम रद्द करू शकत नाही !

तुमचा आरोग्य विमा असेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आरोग्य विम्या ....

अधिक वाचा

पुढे  

दसऱ्यापूर्वी सर्वांसाठी लोकलचा विचार, कार्यालये शिफ्टमध्ये सुरु करण्याचे प्रयत्न : आदित्य ठाकरे
दसऱ्यापूर्वी सर्वांसाठी लोकलचा विचार, कार्यालये शिफ्टमध्ये सुरु करण्याचे प्रयत्न : आदित्य ठाकरे

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांन....

Read more