ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मध्य रेल्वेने साजरे केले विजेवर धावणार्‍या लोकलचे ९५ वे वर्षे

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2020 05:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मध्य रेल्वेने साजरे केले विजेवर धावणार्‍या लोकलचे ९५ वे वर्षे

शहर : मुंबई

           मुंबई : भारतात ३ फेब्रुवारी १९२५ रोजी विजेवर धावणारी पहिली रेल्वे लोकल सुरू करण्यात आली होती. भारतीय रेल्वे सेवेला विद्युत गाड्यांच्या नव्या युगाला आज ९५ वर्षे पूर्ण झाली असून व्हिक्टोरिया (व्हिटी स्थानक) टर्मिनस म्हणजेच आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून कुर्ल्यापर्यंत चालवण्यात आली होती. आज या निमित्ताने मध्य रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक सुशील वावरे यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर  ही लोकल सोडण्यात आली आणि विजेवर धावणार्‍या लोकलला ९५ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्यात आला.

        जुन्या लोकल लाकडांच्या बनावटी होत्या आणि या लोकलचा वेग फक्त ५० मैल इतका होता. मध्य रेल्वेला आधी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे ही कंपनी चालवायची. विद्युत गाड्यांच्या नव्या युगाला ९० हून अधिक वर्षे पूर्ण झाल्यानंतर जुन्या डीसी लोकल चालवणाऱ्या विणा धरण या कर्मचाऱ्याला देखील आज बोलवण्यात आले होते. त्यांनी आपले भूतकाळाचे अनुभव सांगितले. अशावेळी आजचा दिवस साजरा करणे तितकेच महत्त्वाचे ठरते.

 १९२५ पासून विजेवर धावणाऱ्या लोकल खालीलप्रमाणे

* १९२५ - पहिली चार डब्यांची विजेवर चालणारी लोकल हार्बर रेल्वे मार्गावर धावली
* १९२७ - पहिली आठ डब्यांची विजेवर चालणारी लोकल मध्य रेल्वेवर आणि हार्बर रेल्वे मार्गावर धावली
* १९२८ - पश्चिम रेल्वे मार्गावर पहिली विजेवर चालणारी लोकल धावली
* १९६१ - पहिली नऊ डब्यांची लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावली
* १९८६ - पहिली बारा डब्यांची लोकल मध्य रेल्वे मार्गावर धावली

 

मागे

सुधाकर शेट्टी यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीची धाड
सुधाकर शेट्टी यांच्या घरावर आणि कार्यालयावर ईडीची धाड

         मुंबई : सुहाना ग्रुपचे संचालक सुधाकर शेट्टी यांच्या घरी आणि क....

अधिक वाचा

पुढे  

दादरमध्ये रेल्वे कॉन्स्टेबल युवकासाठी बनला देवसारखा
दादरमध्ये रेल्वे कॉन्स्टेबल युवकासाठी बनला देवसारखा

             दादर : दादर रेल्वे स्थानकावर एक रेल्वे पोलीस कॉन्स्टेबल म....

Read more