ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

J-15 Jet | हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता, चीनचं J15 फायटर प्लेन सज्ज

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 01, 2020 07:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

J-15 Jet | हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता, चीनचं J15 फायटर प्लेन सज्ज

शहर : विदेश

कर्ज देऊन छोट्या देशांना लूटणारा चीन, कपटानं इतरांच्या (China J15 Fighter Aircraft) जमिनी बळकावणारा चीन आणि जगभर कोरोना निर्यात करणारा सुद्धा चीन. या तिन्ही मुद्द्यांवरुन अख्खं जग चीनविरोधात गुद्द्याची भाषा करत आहे. म्हणूनच जर संयमाचा बांध फुटला तर चीन हा तिसऱ्या महायुद्धाचं कारण ठरेल (China J15 Fighter Aircraft).

जगात एकटा पडलेल्या चीनविरोधात अमेरिका कधीही युद्धाचा शंखनाद करु शकतो. याचीही जाणीव जिनपिंग यांना आहे. म्हणूनच चीन स्वतःच्या ताकदीमध्ये सुद्धा दिवसेंदिवस भर घालत आहे. आपल्या जीडीपीचा मोठा पैसा चीन सरकारने शस्त्र विकसित करण्यासाठी खुला केला आहे.त्याचाच परिणाम म्हणजे चीनने पहिल्यांदाच रात्रीच्या वेळी हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता विकसीत केली आहे. याचा अर्थ चीनची लढाऊ विमानं आता जमिनीवर उतरता दिवसरात्र इतर देशांच्या वायूसेनेविरोधात लढू शकतात.

चीनने आतापर्यंत इतर देशांच्या अनेक शस्त्रांची डिझाईन चोरी करुन ती स्वतःच्या नावानं मिरवली. मात्र, अंधारात हवेतल्या हवेत लढाऊ विमानांना इंधन भरण्याचं तंत्रज्ञान चीनकडे नव्हतं. मात्र, नुकतंच चीननं नौदलाच्या J15 लढाऊ विमानाच्या सहाय्याने हवेतल्या हवेत इंधन भरण्याची क्षमता यशस्वीपणे विकसीत केली (China J15 Fighter Aircraft).

चिनी मीडियाने या नव्या यशस्वी प्रयोगाचा एक व्हिडीओ सुद्धा जारी केला आहे. चीनचं हे यश भारत आणि अमेरिकेसाठी चिंतेची गोष्ट आहे. कारण, आता चीनचं J15 फायटर प्लेन 24 तास आकाशात सज्ज असेल. आतापर्यंत जगात अमेरिकन नौदल आणि वायुदल हवेतल्या हवेत इंधन रिफील करण्यासाठी तरबेज मानली जातं होती. मात्र, आता त्या रांगेत चीन सुद्धा येऊन ऊभा राहिल्यामुळे अमेरिकेसाठी सुद्धा हे मोठं आव्हान मानलं जातं आहे.

चीनचं J15 विमानाची ताकद

J15 विमानाला चिनी नौदल आणि वायुदलात फ्लाईंग शार्क म्हटलं जातं. या फायटर प्लेनमध्ये कोणत्याही तापमानात लढण्याची क्षमता आहे.

एखाद्या लढाऊ विमानात रात्रीतून हवेतल्या हवेत इंधन भरणं मोठ्या जिकीरीचं काम मानलं जातं. पण त्यात यश मिळवल्यामुळे चीन आता येत्या काळात स्वतःच्या ताफ्यात J15 विमानांची संख्याही वाढवण्याची शक्यता आहे.या तंत्रज्ञानाचा दुसरा फायदा म्हणजे चिनी विमानं आता कमी इंधन भरुन जास्तीत-जास्त मिसाईल्स स्वतःसोबत घेऊन उडतील. कमी इंधनामुळे विमानांचं वजन कमी होतं. त्यामुळे त्यांची मारा करण्याची क्षमता ही जास्त अचूक बनते.

तूर्तास तरी चिनी वायुदलाचा आत्मविश्वास आकाशाला भिडला आहे. म्हणूनच एकीकडे इंधन भरण्याची क्षमता विकसीत केल्यानंतर दुसरीकडे चीननं दीड महिन्यात पहिल्यांदाच दक्षिण चिनी समुद्रात युद्धसराव सुरु केला. समुद्रात उभे केलेले टार्गेट चिनी विमानांनी नष्ट केले.

पाश्चिमात्य मीडियानुसार, चीनचा हा सराव म्हणजे अमेरिकेच्या युद्धनौकांवर हल्ला करण्याची रंगीत तालीम होती. त्यामुळे आता चिनी विमानांना चितपट करण्यासाठी अमेरिकन नौदलालाही पूर्ण ताकदीनं मैदानात उतरावं लागणार आहे.

 

मागे

कोरोनासोबत 'कसे जगायचे' हे शिकायला हवे, दीर्घकालीन Lockdown योग्य नाही – गडकरी
कोरोनासोबत 'कसे जगायचे' हे शिकायला हवे, दीर्घकालीन Lockdown योग्य नाही – गडकरी

देशात नव्हे तर संपूर्ण जगात कोरोना विषाणूचे संकट आहे, असे असले तरी सातत्यान....

अधिक वाचा

पुढे  

Mumbai Water Supply | मुंबईत 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणी कपात
Mumbai Water Supply | मुंबईत 5 ऑगस्टपासून 20 टक्के पाणी कपात

मुंबई महापालिका क्षेत्रात येत्या 5 ऑगस्टपासून पाणी कपात करण्यात येणार आहे. ....

Read more