ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

चिमूरड्या विद्यार्थ्याकडून गटाराची सफाई

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 20, 2019 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चिमूरड्या विद्यार्थ्याकडून गटाराची सफाई

शहर : बुलढाणा

             बुलडाणा - खामगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून गटार आणि नाले साफ करवून घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. याप्रकरणी शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली असून लवकरच कारवाई होईल याचे आश्वासन दिले आहे.
          ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे यासाठी शासनाकडून विविध शैक्षणिक सवलती आणि योजना राबविण्यात येतात. मात्र बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणाऐवजी शिक्षकांकडून इयत्ता 1 ते 7 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकडून संपूर्ण गावातील घाण कचरा आणि गटार साफ करवून घेतले. विशेष म्हणजे यावेळी शाळेतील शिक्षक बाजूला उभे राहून हे सर्व बघत होते.


          गटार साफ करणाऱ्या सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना काल सकाळची शाळा होती. मात्र शाळेत शिक्षणाऐवजी चिमुकल्या हाताकडून गटारे साफ करून घेतले गेले. हा प्रकार येथील काही नागरिकांनी कॅमेरात कैद करून गावातीलच व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये व्हायरल केला. यामुळे बघ्यांची भूमिका घेणाऱ्या शिक्षकांच्याविरोधात गावातून संतापाची लाट उसळली. 


         याबाबत मुख्याध्यापक चांदणे काहीही बोलायला तयार नाहीत. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन संबंधितावर लवकर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.

         या गंभीर प्रकाराबाबत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले असता त्यांनीही हा गंभीर प्रकार असल्याचे कबूल केले आहे. शिवाय जे कोणी याप्रकरणात दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, असे आश्वसन दिले. यासर्व प्रकरणात मुख्याध्यापक दोषी आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कारवाईचे संकेत शिक्षण विभागाने दिले आहे.
 

मागे

नाशिक रोड रेल्वे स्थानकात ओक्सिजन पार्लर
नाशिक रोड रेल्वे स्थानकात ओक्सिजन पार्लर

         नाशिक - देशातील प्रमुख शहरात औद्योगीकरणामुळे दिवसेंदिवस प्रद....

अधिक वाचा

पुढे  

मंदीवरुन लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायदा - राज ठाकरे
मंदीवरुन लक्ष हटवण्यासाठी नागरिकत्व कायदा - राज ठाकरे

मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्याव....

Read more