ठळक बातम्या मद्यपानाची सवय सोडण्यासाठी उपाय.    |     Tulsi Vivah 2020: अशी सुरु झाली तुळशी विवाहाची परंपरा, यंदा 'हा' आहे मुहुर्त.    |     धनतेरसला धणे का विकत घेतात? जाणून घ्या.    |     धनत्रयोदशी पूजा विधी आणि यमदीपदानाचे महत्त्व.    |     नरक चतुर्दशीला मारुतीचा जन्म झाला, या दिवशी काय करतात जाणून घ्या.    |    

दिल्लीची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल, मुख्यमंत्री केजरीवालांचा महत्त्वाचा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 17, 2020 06:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिल्लीची लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल, मुख्यमंत्री केजरीवालांचा महत्त्वाचा निर्णय

शहर : देश

दिल्लीत कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेता दिल्ली सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन सांगितले की, आम्ही लहान स्तरावरचा लॉकडाऊनचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला आहे. हे आंशिक लॉकडाउन असेल.

यासह सीएम केजरीवाल यांनी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने विवाह सोहळ्याला येणार्‍या लोकांची संख्याही कमी करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. आता फक्त 50 लोक लग्न सोहळ्याला उपस्थित राहू शकतात. सीएम केजरीवाल म्हणाले की, 'गर्दी वाढल्यास बाजारपेठा बंद केल्या जातील.'

दिल्तीत गेल्या 10 दिवसांत नवीन प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत. दिवसाला 8000 पेक्षा जास्त रुग्ण वाढत आहेत. प्रदूषण, जास्त चाचणी, निष्काळजीपणा यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.

यापूर्वी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले होते की, तिसऱ्या लाटेचा काळ संपला आहे, त्यामुळे लॉकडाऊनची गरज नाही. दिल्लीचे आरोग्यमंत्री म्हणाले की, आम्ही दिल्लीतील 29% लोकांची चाचणी केली आहे. घरात क्वारंटाईन झाल्याने प्रकरणे वाढत नाहीत. दिल्लीत कोरोनासाठी 16500 बेड आहेत. खाजगी रुग्णालयांमध्ये बेडची समस्या आहे कारण सर्व खाजगी रुग्णालयात जात आहेत.

 

 

मागे

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र राहावी हे बाळासाहेबांचे स्वप्न - रामदास आठवले
शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र राहावी हे बाळासाहेबांचे स्वप्न - रामदास आठवले

केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळ....

अधिक वाचा

पुढे  

फक्त लशीमुळे कोरोना संपू शकेल असं मानणं चुकीचं : डॉ. प्रदीप आवटे
फक्त लशीमुळे कोरोना संपू शकेल असं मानणं चुकीचं : डॉ. प्रदीप आवटे

“कोरोना लशीवर काम सुरु आहे. मात्र, फक्त लशीमुळे कोरोना संपू शकेल असं मानणं ....

Read more