ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

CM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 22, 2021 10:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

CM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे

शहर : मुंबई

कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष्टपणे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीमी जबाबदारया मोहिमेची घोषणा केली. गर्दी वाढत असून  राजकीय, सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही तसेच नियम पाळणारी मंगल कार्यालये, सभागृहे, हॉटेल्स, उपाहारगृहे यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचेही ते म्हणाले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला समाजमाध्यमांतून संबोधित करीत होते.

आता राज्यभरमी जबाबदारमोहीम

संसर्ग रोखण्यासाठी अमरावती विभागात कडक निर्बंध घालण्यात आले आहेत त्याचा संदर्भ देऊन मुख्यमंत्री म्हणाले की, जिथे जिथे आवश्यकता  असेल तिथल्या जिल्हा प्रशासनाने आवश्यक ते निर्बंध घालण्याचे निर्देश आपण दिले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी आता राज्यभरमी जबाबदारमोहीम राबविण्यात येत आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहीम यशस्वी झाली, आपण संसर्गाला रोखलेसुद्धा. पण त्यावेळी बहुतेक सर्व जण आपापल्या घरांत होते. आता आपण सर्व काही खुले केले आहे, आपण सर्व बाहेर आलो आहोत  त्यामुळे मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात सतत धूत राहणे ही  आपली व्यक्तिगत जबाबदारी आहे.

8 दिवसांत जनतेने निर्णय घ्यावा

कोविड-19  परिस्थितीत आपल्याला जनतेशी या माध्यमातून संवाद करताना समाधान मिळते आणि आपण देखील मला परिवाराचा एक सदस्य म्हणून माझे ऐकता असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात लॉकडाऊन लावायचा की नाही याचा निर्णय पुढील 8 दिवसांत जनतेने करायचा आहे असे सांगितले. मास्क घाला,

शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा. ज्यांना लॉकडाऊन हवा आहे त्यांनी  मास्क घालू नये आणि आरोग्याची कुठलीही शिस्त पळू नये असेही ते म्हणाले.

'आरोग्य यंत्रणेवर ताण येऊ देऊ नका'

गेले वर्षभरापासून आपण कोरोनाला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय , त्यात आपल्याला यशही आले . मुंबईत आपण दिवसाला 300 ते 400 रुग्ण संख्येपर्यंत खाली उतरलो मात्र आता काही दिवसांपासून 800 ते 900 रुग्ण आढळत आहेत. राज्यातही दररोज हजार ते दीड हजार रुग्ण वाढताहेत, आज दिवसभरात सुमारे 7 हजार रुग्ण आढळले ही  चिंताजनक बाब आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीगेल्या वर्षी कोरोनाची सुरुवात झाली तेव्हा आपल्याकडे सुविधा नव्हत्या, ऑक्सिजन, बेड्स, रुग्णालये, प्रयोगशाळा पुरेशा नव्हत्या.

पण आता सुविधांनी आपण सज्ज आहोत मात्र आता वाढत चालवलेला संसर्ग आपण थांबविला नाही तर या आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण येईल. एकीकडे आपण सगळॆ खुले करून अर्थचक्राला गती देत आहोत, लोक बिनधास्तपणे नियम मोडून फिरताहेत आणि दुसरीकडे आपण प्रशासन आणि एकूणच यंत्रणेला चाचण्या आणि रुग्णांचे जास्तीत जास्त संपर्क वाढविण्यास सांगतो आहोत हे बरोबर नाही.

सामाजिक जबाबदारी ठेऊन वागणे महत्त्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांच्या मुलाचा विवाहाचा स्वागत सोहळा रद्द करून भान ठेवले यासाठी त्यांचे अभिनंदन केले.

'कोविड पसरविणारे कोविडदूत बनू नका'

पाश्चिमात्य देशात कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळे त्या ठिकाणी मोठे निर्बंध टाकण्यात आले आहेत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की सर्व काही खुले करा म्हणून नियम मोडून आंदोलने करणारे आता जेव्हा संसर्ग पसरतोय तेव्हा वाचवायला येणार नाहीत. सध्या कोविड योद्ध्यांचे सत्कार सुरु आहेत. या योध्यांनी जीवावर उदार होऊन लढाई केली आहे, मात्र त्यांच्या सत्काराच्या निमित्ताने आपण कोविड पसरविणारे कोविडदूत बनू नका असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मागे

चालकाने मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त; प्रशासनाचा मोठा निर्णय
चालकाने मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त; प्रशासनाचा मोठा निर्णय

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलीस प्....

अधिक वाचा

पुढे  

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी आत्महत्या
टिकटॉक स्टार समीर गायकवाडची राहत्या घरी आत्महत्या

टिकटॉक स्टार (TikTok) समीर गायकवाड (Sameer Gaikwad)  याने रविवारी घरातील पंख्याला साडीच्....

Read more