ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न, पण गाफिल राहू नका, ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचना

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 24, 2020 06:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न, पण गाफिल राहू नका, ठाणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांच्या सूचना

शहर : ठाणे

कोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहे. त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही. त्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. नुकतंच उद्धव ठाकरेंनी ठाणे महापालिकेत आढावा बैठकींसाठी हजेरी लावली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीला नगरविकास मंत्री तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, सर्व मनपा आयुक्त, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक उपस्थित होते

लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथीलता दिली आहे. तसेच दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करावे तसेच नागरिकांनी नियमांचे पालन करावे,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तीक आणि सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याच्या सूचना त्यांना प्रशासनाला केल्या.”

तसेच पावसाळी आजारांकडे दुर्लक्ष करु नका. ठाणे मुंबईला लागून आहे. गेले काही महिने कोरोनावर लक्ष दिले गेले. पण आता आपल्याला इतर बाबीवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. पावसाळी आजारांना दुर्लक्ष करु नका. मजुरांअभावी अनेक कामे बंद आहेत. नागरिकांतील भीती कमी होत आहे. हळूहळू सर्व मूळ पदावर आणायचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कोरोना दक्षता समिती प्रत्येक वॉर्डात स्थापन करावी. जगजागृती मोहिम सातत्याने सुरु ठेवावी लागणार आहे. अनलॉक करताना समाविष्ट सुरक्षेचे नियम आणि मास्क वापरणे तसेच हात धुवत राहणे हेच अनलॉकवर औषध आहे. कंटेन्मेंट झोन तसेच ट्रेसिंगवर भर देण्यात यावा. शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे. आपण आपले काम कर्तव्य भावनेने आणि निष्ठेने करा, अशा काही सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.

मागे

मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य
मुंबईत आवाजावरुन कोरोना चाचणीला सुरुवात, निदान लवकर करणं शक्य

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी गोरेगावमधील नेस्को जंबो सुविधा केंद्र येथे....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्र पोलिसांना 58 राष्ट्रपती पुरस्कार, बिहार पोलिसांना किती? : गृहमंत्री अनिल देशमुख
महाराष्ट्र पोलिसांना 58 राष्ट्रपती पुरस्कार, बिहार पोलिसांना किती? : गृहमंत्री अनिल देशमुख

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण....

Read more