ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

विदर्भातील अहमदनगर मध्ये थंडीचे वारे सुरु...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 01:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विदर्भातील अहमदनगर मध्ये थंडीचे वारे सुरु...

शहर : अमरावती

अमरावती :  उशिरा का होईना राज्यात विविध ठिकाणी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात थंडीचा जोर वाढलेला दिसुन आला आहे. अमरावतीमध्ये ११ अंश सेल्सियस पेक्षा तापमान खाली घसरत असल्याने ग्रामीण भागातील लोकांना थंडीची हुळहुळी भरली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांनी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवून गप्पा मारताना दिसत आहेत. तर सकाळच्या वेळी तोंडाला कापड बांधून नागरिक घराबाहेर निघात आहेत. याच थंडीचा फायदा रब्बी पिकाला देखील फायदेशीर ठरत आहे.

कन्याकुमारी मालदीव पट्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येमेन किनारपट्टीवर पवन नामक वादळ सक्रिय असल्याने हवेच्या दिशेत बदल झाला आहे. त्यामुळे वाऱ्याची दिशा उत्तरेकडे असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. पुढील ४ ते ५ दिवस थंडीचा जोर विदर्भात कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

मागे

“घुसखोरांना” पुढील 25 वर्षे मतदानाचा हक्क नको -शिवसेना
“घुसखोरांना” पुढील 25 वर्षे मतदानाचा हक्क नको -शिवसेना

महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्ष शिवसेनेने केंद्र सरकारच्या नागरिकत्व विधे....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगरुळ जातीचे मासे; बघ्यांची गर्दी वाढली
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगरुळ जातीचे मासे; बघ्यांची गर्दी वाढली

रायगड - मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर एक वेगळं चित्र पहायला मिळालं. रस्त....

Read more