ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई: मुख्यमंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 08:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तोक्ते चक्रीवादळग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळग्रस्तांप्रमाणे नुकसान भरपाई: मुख्यमंत्री

शहर : मुंबई

तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली आहे. तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसून अनेकांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे नुकसानग्रस्तांना निसर्ग चक्रीवादळ नुकसानग्रस्तांप्रमाणेच मदत दिली जाईल अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

21 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी कोकण दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला आणि तात्पुरती घोषणा करता आढावा घेऊन व्यवस्थित मदत दिली जाईल कुणालाही वंचित ठेवणार नाही असे आश्वस्त केले होते त्याप्रमाणे त्यांनी आज ही घोषणा केली.

निसर्ग चक्रीवादळात दिलेली मदत :

घरांसाठी नुकसान भरपाई

- २५ टक्क्यापेक्षा जास्त घराचे नुकसान झाले असल्यास २५ हजार

- ५० टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले असल्यास ५० हजार

- पूर्ण घराचे नुकसान झाले असल्यास दीड लाख रुपये मदत मिळणार

घरातील साहित्याचे नुकसान झाले असल्यास

- अन्नधान्य भिजले असल्यास आणि भांड्यांचे नुकसान झाले असल्यास १० हजार रुपये मदत

मच्छिमारांसाठी नुकसान भरपाई

- अंशतः नुकसान झालेल्या बोटींसाठी १० हजार रुपये भरपाई मिळणार

- बोटीचे पूर्ण नुकसान झाले असल्यास २५ हजार रुपये वाढीव मदत

- मच्छिमारांच्या जाळीचे नुकसान झाले असेल तर हजार रुपये वाढीव मदत

- पूर्ण जाळीचे नुकसान झाले असेल तर १० हजार मदत मिळणार

- नुकसानग्रस्त दुकानमालक टपरीचालकांना नुकसानीच्या 75 टक्के मर्यादेत कमाल 10 हजार रुपये मदत

- बहुवार्षिक शेतीच्या नुकसानीपोटी ५० हजार रुपये प्रतिहेक्टर दोन हेक्टरच्या कमाल मर्यादेत

 

मागे

PSI Exam|आयोगाच्या पोलीस उपनिरिक्षक पदासाठीच्या निवड प्रक्रियेत बदल
PSI Exam|आयोगाच्या पोलीस उपनिरिक्षक पदासाठीच्या निवड प्रक्रियेत बदल

राज्यातील असंख्य विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या उ....

अधिक वाचा

पुढे  

फायझर-मॉडर्ना लसी भारताला इतर देशांपेक्षा खूप उशीरा मिळण्याची शक्यता...कारण
फायझर-मॉडर्ना लसी भारताला इतर देशांपेक्षा खूप उशीरा मिळण्याची शक्यता...कारण

देशामध्ये सध्या कोरोना संकटात लसीची तीव्र कमतरता आहे. काही राज्यांमध्ये, 18-45....

Read more