ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नागपूरमधील सरकारी कार्यालयांचं अनधिकृत बांधकाम पाडणार का? काँग्रेस आमदाराचा संतप्त सवाल

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2020 09:46 AM 2019-02-12T14:15:30+5:30

नागपूरमधील सरकारी कार्यालयांचं अनधिकृत बांधकाम पाडणार का? काँग्रेस आमदाराचा संतप्त सवाल

शहर : नागपूर

शहरातील अनधिकृत बांधकामांवरील कारवाईवरुन काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. नागपूरमधील बगदादी नगरमध्ये अतिक्रमणाची कारवाई सुरु आहे. या विरोधात नागरिक संतप्त झालेत. यावरुनच आमदार ठाकरे यांनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. अनधिकृत इमारतींना वीज, नळ जोडणी, रस्ते या सुविधा कशा मिळाल्या? आणि सरकारी कार्यालयांचं अनधिकृत बांधकाम पाडणार का? असे अनेक प्रश्न ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना विचारले आहेत.

आमदार विकास ठाकरे यांनी मनपा आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी शहरातील सरकारी, खासगी अनधिकृत बांधकामांबाबत माहिती मागितली आहे. या पत्रात ते म्हणाले, “नागपूर शहरातील अनधिकृत बांधकामांची संख्या लक्षणीय असल्याचे आढळते. यात खासगी आणि सरकारी जमिनीवरील बांधकामांचा समावेश आहे. शहरातील अनेक शासकीय आणि खासगी जमिनीवरील अनधिकृत बांधकाम नेमके कोणते कोणते आहेत? विशेष म्हणजे अनधिकृत बांधकाम म्हणजे काय? याविषयी शहराचा काँग्रेसचा काँग्रेस पक्षाचा आमदार या नात्याने मला विस्तृत माहिती जाणून घ्यायची आहे.”

शहरातील अशा किती अनधिकृत बांधकामांचे नकाशे मंजूर नाहीत? नागपूर महापालिकेने मंजूर केलेल्या नकाशापेक्षा अधिक बांधकाम केले आहे अशी किती शासकीय आणि खासगी बांधकामं शहरात आहेत? शहरातील बहुतांश भागातील बांधकामांना अधिकृत परवानगी नसल्याचे आढळून आले आहे. मनपाच्या मालकीच्या जागेंवर दुसऱ्यांनी कब्जा करुन अनधिकृत बांधकाम केलं आहे. जुन्या वस्त्यांवरील बांधकामांना मंजुरी प्राप्त नाही. अशा सर्व बांधकामांची माहिती द्यावी,” अशी मागणी आमदार ठाकरे यांनी केली आहे.

सत्र न्यायालयाच्या 8 व्या मजल्यावरील बांधकाम अनधिकृत नाही का?”

आमदार विकास ठाकरे यांनी शहरातील सरकारी अनधिकृत बांधकामांच्या प्रश्नाला देखील हात घातला आहे. ते म्हणाले, “नागपूर महापालिकेच्या किती इमारतींमध्ये झोन कार्यालयात आणि शाळेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे? सत्र न्यायालयाच्या 8 व्या मजल्यावरील बांधकाम हे देखील अनधिकृत नाही का? शहरातील किती पोलीस स्टेशनच्या इमारतींच्या बांधकामाचा नकाशा मंजूर आहे? किती पोलीस स्टेशनमध्ये मंजूर नकाशा व्यतिरिक्त अनधिकृत बांधकाम केले आहेत?”

मागे

आजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर
आजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर

आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान....

अधिक वाचा

पुढे  

Hathras Case : पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना अटक
Hathras Case : पीडितेच्या कुटुंबाला भेटण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना अटक

उत्तर प्रदेशातील हाथरस Hathras Case  या खेड्यात १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार करुन त....

Read more