ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

कोरोना लॉकडाऊन : लातूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 02, 2020 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना लॉकडाऊन : लातूरमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

शहर : लातूर

शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर त्यांना भर रस्त्यात बसविण्यात आले. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यापुढील रस्त्यावर सर्वाना सोशल डिस्टनसिंग करुन बसविण्यात आले.

राज्यात कोरोनाचे संकट गडद होत चालले आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आणि संचारबंदी करण्यात आली आहे. तरीही काही लोक घरात थांबायचे नाव घेत नाहीत. घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे हात जोडून आवाहन करत आहेत, कोरोनाला दूर ठेवायचे असेल तर घराबाहेर पडू नका, काळजी घ्या. मात्र, नागरिकांना याचे देणं घेणं नसल्याचे शहरात दिसून येत आहे. शहरात मॉर्निंग वॉकला निघालेल्या ७० ते ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम १४४ आणि संचारबंदी आदेशांचं उल्लंघन करत फिरण्यासाठी हे सगळेजण घराबाहेर पडले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

लातूर शहरात मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्यांवर कलम १८८ प्रमाणे होणार गुन्हा दाखल करण्यात  आला आहे. लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यापुढील रस्त्यावर सर्वाना सोशल डिस्टनसिंग करुन बसविण्यात आले. आतातरी नागरिक घराबाहेर पडणार नाही, अशी चर्चा शहरात सुरु आहे

मागे

कोरोनाचा धोका वाढला, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी चार दिवसांवर !
कोरोनाचा धोका वाढला, रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी चार दिवसांवर !

देशात आणि राज्यात कोरोनाचे संकट दिवसागणिक वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचे संकट : देशात १८३४ जण बाधित तर १४४ जण कोरोनामुक्त
कोरोनाचे संकट : देशात १८३४ जण बाधित तर १४४ जण कोरोनामुक्त

देशात कोरोनाचे संकट वाढत आहे. दिल्लीत धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या....

Read more