ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ, राज्यात पहिल्या दिवशी 28,500 कोरोनायोद्ध्यांना लस

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 16, 2021 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लसीकरणाचा शुभारंभ, राज्यात पहिल्या दिवशी 28,500 कोरोनायोद्ध्यांना लस

शहर : मुंबई

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेलीकोव्हिशील्ड आणि भारत बायोटेकचीकोव्हॅक्सिन या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते राज्यव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.

राज्यातील लसीकरण मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज सकाळी 11.30 वा. मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील कोविड केअर सेंटरमध्ये होणार आहे. तर देशव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सकाळी 10.30 वा. होणार आहे. पंतप्रधान मोदी विलेपार्लेतील डॉ. आर. एन. कुपर रुग्णालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरण मोहिमेचं उद्घाटन करणार आहेत.

मुंबईतील लसीकरण मोहीम

मुंबईत एकूण 9 केंद्रांवर 40 बूथवर लसीकरण होणार आहे. सुरवातीला दररोज सरासरी 4 हजार जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून कोविड 19 आजारावरीलकोविशील्ड या लसीचे सुमारे 1 लाख 39 हजार 500 डोस उपलब्ध झाले आहेत. महानगरपालिकेकडे 1 लाख 30 हजार लसींची लसीकरणासाठी नोंदणी झाली आहे. या मोहिमेसाठी 7 हजार कर्मचाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

कोणत्या टप्प्यात कुणाला लस?

केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार तीन टप्प्यात लसीकरण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱया टप्प्यात क्षेत्रीय आघाडीवर काम करणारे स्वच्छता कर्मचारी कामगार, पोलीस आदी. त्यानंतर तिसरऱ्या टप्प्यात 50 वर्षावरील सर्व नागरिक तसेच 50 वर्षाखालील सहव्याधी (मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी) असणारे नागरिक यांना लसीकरण करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात मुंबईत 63 लसीकरण केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. त्यांद्वारे दररोज सुमारे 50 हजार नागरिकांचे लसीकरण करता येणार आहे.

आपत्कालीन वापराला मंजुरी पण संभ्रम!

केंद्र सरकारनं कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. त्यापैकी सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठानं संयुक्तरित्या निर्मिती केलेल्या कोव्हिशील्ड या लसीच्या तिन्ही मानवी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. पण भारत बायोटेकनं विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन या लसीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी अद्याप सुरु आहे. त्यामुळे एकीकडे कोव्हिशील्डची परिणामकारकता समोर आली असली तरी कोव्हॅक्सिनची परिणामकारकता अद्याप स्पष्ट नाही. दुसरीकडे लस घेणं ही ऐच्छिक बाब असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं असलं तरी लस निवडण्याचं स्वातंत्र्य मात्र दिलेलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये अद्याप काहीसा संभ्रम कायम आहे.

राज्य आणि केंद्रातील लसीकरण मोहीम

>> राज्यात पहिल्या दिवशी सुमारे 28 हजार 500 कोरोना योद्ध्यांना लस दिली जाणार आहे.

>> देशभरात जवळपास 3 कोटी कोरोनायोद्ध्यांला लस दिली जाईल.

>> राज्यात 285 लसीकरण केंद्रांवर मोहिमेला सुरुवात

>> कोरोना योद्ध्यांच्या पहिल्या टप्प्यातील लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार उचलणार, सर्वसामान्य नागरिकांच्या लसीकरणाच्या खर्चाबाबत सरकारकडून अद्याप स्पष्टीकरण नाही.

>> प्रत्येक केंद्रावर रोज 100 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाणार

>> कोव्हिशील्ड लसीचे 1 कोटी 10 लाख डोस उपलब्ध

>> कोव्हॅक्सिनचे 55 लाख डोस उपलब्ध

लस कुणाला नको?

>> स्तनदा माता आणि गर्भवती महिला

>> इंजेक्शन, लस किंवा कुठल्याही औषधांमुळे, खाद्यपदार्थांमुळे अॅलर्जी असलेल्यांना

>> लसीचा पहिला डोस दिल्यानंतर संबंधित व्यक्तीला अॅलर्जी झाल्यास

>> ज्या लसीचा पहिला डोस घेतला असेल त्याच लसीचा दुसरा डोस घ्या

 

मागे

चीनची लस फेल ठरल्यानंतर ब्राझीलची मदतीसाठी भारताकडे धाव; लशीच्या कुप्या घेण्यासाठी विमानच पाठवलं
चीनची लस फेल ठरल्यानंतर ब्राझीलची मदतीसाठी भारताकडे धाव; लशीच्या कुप्या घेण्यासाठी विमानच पाठवलं

कोरोनाच्या देशव्यापी लसीकरणाला (Vaccination) अवघे काही तास उरले असतानाच आता ब्राझी....

अधिक वाचा

पुढे  

पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता थेट ‘आकाशवाणी’वरुन इंग्रजीचे धडे!
पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आता थेट ‘आकाशवाणी’वरुन इंग्रजीचे धडे!

कोरोना आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर यंदा शालेय विद्यार्थ्यांचं मोठं नुक....

Read more