ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 13, 2021 10:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल, परेलमध्ये साठवणूक, एका दिवसात किती जणांना लस?

शहर : मुंबई

केंद्र सरकारने भारत आणि सीरमच्या दोन कोरोना लसींना परवानगी दिली आहे. कोरोनाबाबत येत्या 16 जानेवारीपासून देशभरात लसीकरण सुरु केले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्या आहेत. कोविड लसीचा पहिला साठा मुंबईत दाखल झाला आहे. महानगरपालिकेच्या विशेष वाहनाने ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली. मुंबईत कांजूर येथील कोल्ड स्टोरेजमध्ये लस साठवली जाणार होती, मात्र या स्टोरेजचे काम अपूर्ण असल्याने लसीचा साठा परेलमधील एफ साऊथच्या पालिका कार्यालयात ठेवला जाणार असल्याची माहितीही संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट कडून सुमारे 1,39,500 डोस बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाले आहेत. एफ/ दक्षिण विभाग कार्यालयातून मुंबईत लसीकरण केंद्रांमध्ये ही लस पोहोचवण्यात येईल. त्यामुळे 16 जानेवारीला लसीकरणाच्या राष्ट्रीय शुभारंभावेळी मुंबईतही लसीकरण सुरू करणे शक्य होणार आहे.

लसीकरणाची तयारी

मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. गेल्या दहा महिन्यात कोरोनाविरोधात मुंबईकर लढा देत आहेत. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांमुळे काही प्रमाणात कोरोना आटोक्यात आला आहे. याच दरम्यान केंद्र सरकारने कोरोनावरील भारत आणि सीरम या दोन कंपन्यांच्या लसीला मान्यता दिली आहे. लस लवकरच उपलब्ध होणार असल्याने देशात आणि महाराष्ट्रात कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहेत. मास्टर ट्रेनरला ट्रेनिंग देऊन लसीकरणासाठी कर्मचारी प्रशिक्षित करण्यात आले आहेत.

लसीकरण केंद्रांवर लसीकरणाचा ड्राय रन घेण्यात आला आहे. त्यानंतर लस कधी येणार याची प्रतीक्षा असताना आज देशभरातील दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा, बंगळुरु, लखनौ, चंदिगढ अशा 13 ठिकाणी लस पाठवण्यात आली आहे.

पहिली लस परेलमध्ये साठवणार

मुंबईत लस आल्यावर ती साठवून ठेवण्यासाठी कांजूरमार्ग येथे महापालिकेच्या जागेत कोल्ड स्टोरेज उभारण्यात आले आहे. या कोल्ड स्टोरेजमध्ये एका वेळी एक कोटी लसी साठवता येऊ शकतात. तसेच परेल येथे एफ साऊथ येथे दहा लाख लसी साठवता येऊ शकतात. अशी व्यवस्था पालिकेकडून करण्यात आली आहे. देशभरात 13 ठिकाणी लस पाठवण्यात आल्यावर आता उद्या मुंबईत लस येणार आहे. मुंबईमधून सव्वा लाख आरोग्य कर्मचारी आणि इतर फ्रंटलाईन वर्कर अशा दोन लाख जणांची नावे कोविन अॅपवर नोंदवण्यात आली आहेत. या दोन लाख व्यक्तींना लसीचे प्रत्येकी दोन डोस दिले जाणार आहेत. त्या प्रमाणात लस येईल अशी अपेक्षा आहे.

मागे

अवघ्या चार दिवसात भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात, संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष
अवघ्या चार दिवसात भारतात कोरोनावरील लसीकरणास सुरुवात, संपूर्ण जगाचं भारताकडे लक्ष

भारतात कोरोनावरील लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात केली जाणार आहे. पहिल्....

अधिक वाचा

पुढे  

अखेर ब्रिटनहून परतलेले नागरिक सापडले, शोध घेण्यासाठी घ्यावी लागली पोलिसांची मदत
अखेर ब्रिटनहून परतलेले नागरिक सापडले, शोध घेण्यासाठी घ्यावी लागली पोलिसांची मदत

ब्रिटनहून परतल्यानंतर कोणतही चाचणी न करता विमानतळावरुन पळून गेलेल्या 35 ना....

Read more