ठळक बातम्या दर रोज 30 मिनिटे पायी चालण्याचे फायदे कळल्यावर कधीच कंटाळा करणार नाही.    |     थंड हवामानात निरोगी राहण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा.    |     मद्यपानाची सवय सोडण्यासाठी उपाय.    |     Tulsi Vivah 2020: अशी सुरु झाली तुळशी विवाहाची परंपरा, यंदा 'हा' आहे मुहुर्त.    |     धनतेरसला धणे का विकत घेतात? जाणून घ्या.    |    

कोरोना लसीचे डोस ‘सीरम’मधून रवाना, पोलीस उपायुक्त नम्रता पाटलांच्या हस्ते पूजा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 12, 2021 11:03 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना लसीचे डोस ‘सीरम’मधून रवाना, पोलीस उपायुक्त नम्रता पाटलांच्या हस्ते पूजा

शहर : पुणे

भारतातील पहिल्या वहिल्या कोव्हिशील्ड लसीचे (covishield vaccine) डोस आज (12 जानेवारी) पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे 5 वाजता विमानतळाकडे रवाना झाले. यावेळी लसींचे डोस इतर शहरांमध्ये रवाना होण्यापूर्वी त्याची पूजा करण्यात आली. या पुजेचा मान पुणे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील (Namrata Patil) यांना मिळाला. त्यांनी हार, फुलं वाहत कंटेनरची पूजा केली. यावर बोलताना माझ्यासाठी हा मोठा मान असल्याचं नम्रता पाटील यांनी म्हटलंय.

“सीरम इन्स्टिट्यूटने उत्पादित केलेल्या कोव्हिशील्ड या लसीचे डोस काल पुण्यात आले. यावेळी सीरम संस्थेचे सर्व अधिकारी उपस्थित होते. देशाला ही लस मिळाली ही फार मोठी गोष्ट आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. ,” अशी प्रतिक्रिया बहूमान मिळाल्यानंतर नम्रता पाटील यांनी व्यक्त केली.

नारळ फोडून कंटेनर रवाना

कोव्हीशिल्ड लसीचे डोस काल (11 जानेवारी) पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर आज या लसीचे काही डोस देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये रवाना होणार आहेत. त्याआधी लसीचे डोस कंटेनरमध्ये भरल्यानंतर त्याची नारळ फोडून पूजा करण्यात आली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूटचे पदाधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. पोलिसांचाही मोठा ताफा तैनात करण्यात आला होता. पुणे विमानतळावरून लसीचे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.

दरम्यान, सीरमच्या कोव्हिशील्ड (covishield vaccine) आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन (Covaxin) या दोन लसींच्या आपातकालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर कोव्हिशील्ड लस देशाबाहेर पाठवता येणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला होता. कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीला आता थेट मार्च किंवा एप्रिल महिन्यातच परवानगी मिळू शकते. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले होते.

मागे

राज ठाकरेंचा रॉयल कारभार, सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात
राज ठाकरेंचा रॉयल कारभार, सरकारने सुरक्षेत कपात करताच मनसेकडून ‘महाराष्ट्र रक्षक’ तैनात

राज्य सरकारने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केल्य....

अधिक वाचा

पुढे  

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतात ‘पेपरलेस बजेट’ सादर होणार, अर्थ मंत्रालयाचा निर्णय
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच भारतात ‘पेपरलेस बजेट’ सादर होणार, अर्थ मंत्रालयाचा निर्णय

येत्या 1 फेब्रुवारी रोजी भारताचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यंदाचा अर्....

Read more