ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Covishield Vaccine | 'कोविशील्ड' लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2020 12:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Covishield Vaccine | 'कोविशील्ड' लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या रुग्णालयाला परवानगी

शहर : नागपूर

कोरोना प्रतिबंधक लसकोविशील्डची मानवी चाचणी आता नागपुरात होणार आहे. नागपूरच्या मेडिकल शासकीय रुग्णालयाला त्याची परवानगी मिळाली आहे. ‘ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, ‘ऍस्टेजेनका, आणि पुण्याच्यासिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यांनी एकत्र येऊन तयार केलेली आणि संपूर्ण जगाचं लक्ष लागलेल्याकोविशील्ड या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचणीसाठी नागपूरच्या मेडिकल या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालया परवानगी मिळाली आहे. पहिल्या टप्प्यात 100 व्यक्तींवर ही चाचणी केली जाणार असून पुढील आठवड्यापासून या चाचणीच्या रितसर नोंदणीला सुरुवात होणार आहे .

भारतात तयार करण्यात येत असलेल्या स्वदेशीकोव्हॅक्सिन लसीचा दुसरा टप्पा नागपुरात सुरु झाला असताना आताकोविशील्ड लसीच्या मानवी चाचणीला सुरुवात होणार असल्यानं नागपूरच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवल्या जाणार आहे. कोरोनावरील लसनिर्मिती अंतिम टप्यात आहे. विशेषतःकोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या लसीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

नागपुरात 49946 जणांची कोरोनावर मात

नागपूर शहरात सतत कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. तर मृत्यूचं प्रमाण सुद्धा वाढत आहे. मात्र, आरोग्य यंत्रणेला दिलासा देणारी बाब म्हणजे बरं होणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत असून आतापर्यंत 49,946 जणांनी केली कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून बरं होणाऱ्यांचं प्रमाण 79.88 इतकं आहे.

गेल्या 24 तासात 1,550 जणांनी कोरोनावर मात केली. तर कोरोनामुळे 52 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्याशिवाय, 1,629 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या 62,531 वर पोहचली. तर मृत्यूंची संख्या 1,992 वर पोहोचली आहे.

 

मागे

Mumbai Local | रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना नोटीस, मनसे आंदोलनावर ठाम
Mumbai Local | रेल्वेने प्रवास केल्यास कायदेशीर कारवाई, संदीप देशपांडेंना नोटीस, मनसे आंदोलनावर ठाम

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना रेल्वे पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. दादर....

अधिक वाचा

पुढे  

मोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी
मोदी सरकारला मोठे यश; अखेर राज्यसभेत दोन कृषी विधेयकांना मंजुरी

राजकीयदृष्ट्या वादग्रस्त ठरलेल्या दोन कृषी विधेयकांना राज्यसभेत मंजुरी म....

Read more