ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खुषखबर ! भारतामध्ये कोरोना लसीच्या मानवी चाचणीस मंजुरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 03, 2020 01:09 PM 2019-02-12T14:15:30+5:30

खुषखबर ! भारतामध्ये कोरोना लसीच्या मानवी चाचणीस मंजुरी

शहर : देश

भारतीय औषध महानियंत्रण ( DGCI) ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीने संशोधित केलेल्या कोरोना वायरस लसीची देशभरात चर्चा सुरु आहे. याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी मानवी चाचणीस सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीया ( SII) ला मंजुरी देण्यात आलीय.

कोरोना संदर्भातील विषेतज्ञ समितीने चर्चा केल्यानंतर औषध महानियंत्रक डॉ. वी.जी. सोमानी यांनी सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाला रविवारी रात्री उशीरा ही मंजुरी दिली.

कंपनीच्या तिसऱ्या टप्प्याच्या क्लिनिकल ट्रायलआधी सुरक्षे संदर्भातील माहिती केंद्रीय औषध मानक नियंत्रण संगठन (CDSCO) जवळ जमा करावी लागणार आहे. याचे मुल्यांकन माहिती सुरक्षा निरीक्षण बोर्ड ( DSMB) करणार आहे.

ऑक्सफोर्डने विकसित केलेल्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे परिक्षण ब्रिटनमध्ये सुरु आहे. तिसऱ्या टप्प्याचे परीक्षण ब्राझीलमध्ये आणि पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याचे परीक्षण दक्षिण आफ्रीकेत सुरु आहे.दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या परिक्षणासाठी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीयाच्या मागणीवर विचार करण्यात आलाय. एसईसीने २८ जुलैला यासंदर्भात आणखी माहिती मागवली होती. तसेच प्रोटोकॉलमनुसार संशोधन करण्यास सांगितले होते. एसआयआयने संशोधित प्रस्ताव बुधवारी जमा केला. क्लिनिकल ट्रायकसाठी ठिकाणांची निवड पूर्ण देशातून केली जावी असा सल्ला देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून देशात रोज ५० हजारहून अधिक कोरोना रुग्ण आढळत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असताना, दुसरीकडे कोरोनाग्रस्त बरे होण्याचं प्रमाणही वाढत असल्याची दिलासादायक बाब समोर आली आहे. देशात गेल्या २४ तासात सर्वाधिक ५१ हजार २५ ५रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एका दिवसातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे.

मागे

सुशांत आत्महत्या : तपासासाठी मुंबईत आलेले पटना पोलीस पालिकेकडून होम क्वारंटाईन
सुशांत आत्महत्या : तपासासाठी मुंबईत आलेले पटना पोलीस पालिकेकडून होम क्वारंटाईन

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चौकशी करण्यासाठी मुंबईत आलेल....

अधिक वाचा

पुढे  

राममंदिर भूमिपूजन: कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका आली समोर, हे असतील प्रमुख पाहुणे
राममंदिर भूमिपूजन: कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका आली समोर, हे असतील प्रमुख पाहुणे

अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू झाली आहे. या कार्यक्रमाच्य....

Read more