ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू

By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 08, 2020 04:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने महिला ऊसतोड कामगारांचा मृत्यू

शहर : बेळगाव

          बेळगाव : खानापूर तालुक्यातील इटगी जावळी बोगुर पुलावरुन जाणारा ट्रॅक्टर नदीत कोसळल्याने सात महिला कामगारांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. १५ हून अधिक महिला ऊसतोड कामगार ट्रॅक्टरवरुन आज सकाळच्या सुमारास बोगुर गावातून इटगीकडे जात होत्या. परंतु, बोगुर पुलावर चालकाचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट नदीत कोसळला. या अपघातात अन्य आठ महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

           अपघातामध्ये तंगव्वा हुंचेन्नत्ती, अशोक केदारी, शांतवा अल्गोडी, गुलाबी हुंचीकट्टी, नागाव्वा मातोळे, शांतव्वा बिझोरे आणि नीलव्वा मुत्नाळ यांचा मृत्यू झाला आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत. ही दुर्घटना नंदगडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सदर घटनेची माहिची मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

मागे

व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?
व्हॅलेंटाईन डे म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कधी झाली?

आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. दैनंदिन जीवनात आपल्या व्हॅलें....

अधिक वाचा

पुढे  

सोन्याची अंगठी चोरताना अभिनेत्री स्नेहलता पाटीलला अटक
सोन्याची अंगठी चोरताना अभिनेत्री स्नेहलता पाटीलला अटक

          पुणे : पुण्यातील कॅम्प परिसरात एनआयबीएम रोडवरील प्लाझा मॉलम....

Read more