ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बदल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2020 07:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बदल

शहर : मुंबई

दिवाळी जवळ आली की, दरवर्षीच फटाक्यांच्या दु्ष्परिणामांची चर्चा होते. फटाक्यांमुळे दरवर्षीच होणारं ध्वनी आणि वायुप्रदुषण चिंतेचा विषय असतोच. मात्र, यंदाच्या दिवाळीतले फटाके हीच चिंता जरा जास्त वाढवू शकतात. एकीकडे, फटाक्यांमुळे होणारं वायु प्रदुषण कोरोना पेशंटसाठी घातक आहेच.मात्र, फटाके फोडतांना हाताला सॅनिटायझर लावायची सवयही आता महागात पडु शकते. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं दिवाळी सेलिब्रेशन बदललं आहे. कोरोनाकाळात मास्क घालणं आणि सॅनिटायझर वापरणं या दोन्ही सवयी आता अंगवळणी पडल्या आहेत. पण, दिवाळीत फटाके फोडतांना यापैकी वारंवार सॅनिटायझरनं हात साफ करणं ही सवय मात्र महागात पडू शकते.

यंदाच्या दिवाळीत काळजी घेताच फटाके उडवलेत तर दिवाळीत आणि दिवाळीनंतर दुर्घटनांची माळही तडतडायला लागेल. म्हणूनच मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलानं मुंबईकरांना फटाके फोडण्याबाबत काही विशेष सूचना केल्या आहेत.

यंदाची दिवाळी साजरी करतांना काय काळजी घ्याल?

  • दिवाळी साजरी करताना मोठ्या आवाजाचे, मोठ्या आकाराचे, आकाशात उडणारे फटाके फोडू नका.
  • सोबतच फटाके फोडताना सॅनिटायझर जवळ बाळगू नका.
  • हाताला सॅनिटायझर लावू नका. अन्यथा आग लागण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
  • सॅनिटायझरऐवजी साबणानं वारंवार हात स्वच्छ धुवा.
  • जिथे फटाके ठेवले असतील त्याजवळ सॅनिटायझरची बाटली किंवा कॅन ठेऊ नका.
  • फटाके फोडतांना सुती आणि घट्ट कपडे घाला.
  • फटाके फोडल्यानंतर अंघोळ करा.
  •                                  

सॅनिटायझरमधील ज्वलनशील गुणधर्म हे फटाके फोडतांना घातक ठरु शकतात. सॅनिटायझरच्या मदतीनं आग लगेच फैलावू शकते. त्यामुळे, फटाके फोडतांना आकाशात उंच जाऊन फुटणारे फटाके टाळावेत आणि सॅनिटायझर ऐवजी साबणानं हात धुवावे असं आवाहन केलं जातंय. गेल्या वर्षीच्या दिवाळीच्या दोन दिवसांत मुंबईत 127 आगीच्या घटना घडल्या आहेत. तर 2018 मध्ये दिवाळीच्या दोन दिवसांत मुंबईत 209 आगीच्या घटना घडल्या आहे. मुंबईत वर्षाला सरासरी 18,ooo ठिकाणी आगी लागतात. तर, दर महिन्याला सरासरी आगीच्या 1500 घटनांची नोंद होते. मात्र, असं असलं तरी मुंबईकरांना फटाक्यांबाबत पुरेसं गांभीर्य दिसत नाही. फटाक्यांच्या दुकानांजवळची वाढणारी गर्दी दिवाळी जवळ आली हे सांगते पण, कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता हीच गर्दी चिंताही वाढवत आहे.

अनेक राज्यांमध्ये दिवाळीत फटाकेबंदीची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात ठाकरे सरकारनं फटाकेबंदी केली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असं आवाहन केलंय. कोरोना आणि लॉकडाऊनला कंटाळलेल्या अनेकांना यंदाची दिवाळीतरी धुमधडाक्यात साजरी करावी असं वाटतंय. पण, प्रकाशाच्या या उत्सवात नव्या संकटांची नांदी नको इतकंच...

मागे

लासलगावात दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक
लासलगावात दाखल, कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक

आशिया खंडातील अग्रसर कांद्याची दुसऱ्या क्रमांकावर असलेली बाजारपेठ पिंपळग....

अधिक वाचा

पुढे  

मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिणी राहत्या घरात मृत आढळल्या
मंत्री शंकरराव गडाखांच्या वहिणी राहत्या घरात मृत आढळल्या

राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्....

Read more