ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जिल्हा शासकीय रुग्णालयाला डॉक्टरांचा रामराम; शेकडो रुग्णांनाचे आरोग्य धोक्यात 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 10, 2020 12:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जिल्हा शासकीय रुग्णालयाला डॉक्टरांचा रामराम; शेकडो रुग्णांनाचे आरोग्य धोक्यात 

शहर : रत्नागिरी

        रत्नागिरी - रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय डॉक्टरांअभावी चालत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तब्बल ८ महिने पगारच मिळत नसल्याने ६ कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यानी नोकरीला रामराम ठोकला आहे. सर्वसामान्य रूग्णांना नाममात्र शुल्कात रूग्णसेवा मिळावी यासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयांची स्थापना झाली आहे. मात्र रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालयात डॉक्टरांचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.


           विशेष म्हणजे गेली अनेक वर्षे सिव्हीलमध्ये अस्थिरोग तज्ञ म्हणून काम करणारे डॉ. प्रमोद सूर्यवंशी यांनीही राजीनामा दिला असून आणखी काही डॉक्टरही राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे समजते. सध्या वर्ग १ च्या मंजूर १९ पदांपैकी केवळ ३ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. तर वर्ग दोनच्या ३० पैकी केवळ १२ पदेच भरली गेली आहेत. अनेकदा थेट मुलाखती घेऊन ही पदे भरण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यातही फारसे यश आलेले नाही. 


          जिल्हा रूग्णालयातील दररोज शेकडो रूग्ण विविध आजारांच्या उपचारासाठी येत असतात. मात्र सध्या या जिल्हा रूग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. रूग्णांची गैरसोय होवू नये, यासाठी जिल्हा रूग्णालयाकडून विविध प्रयत्न सुरू आहेत. गेल्या सात-आठ वर्षापासून शासकीय रूग्णालयात कोणी नवीन डॉक्टर येत नाही. काही जण रूजू झाले तर ६ महिन्याच्या आत विविध कारणे देत राजीनामा देतात. राज्याचा आरोग्य विभागाकडून होत असलेले दुर्लक्ष यामागील प्रमुख कारण आहे. 


           दरम्यान, डॉक्टरांचे पगार वेळच्या वेळी देणे, इतर समस्या सोडवणे यामध्ये म्हणावे तसे लक्ष दिले जात नाही. मात्र, आरोग्य विभाग पाहणीशिवाय दुसरे काही करत नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा रूग्णालयात विविध सोयी-सुविधा आहेत, मात्र या सुविधा चालवण्यासाठी वैद्यकीय अधिकारीच नाहीत. सोनोग्राफी तज्ञ, फिजिशियन, भूलतज्ञ, स्री रोग तज्ञ आदी वैद्यकीय अधिकार्‍यांची आवश्यकता आहे. डॉ. खलाटे राजीनामा देवून पाच-सहा वर्षे झाली. त्यानंतर अद्यापही ही जागा कायमस्वरूपी भरली गेली नाही. मध्यंतरी एक वैद्यकीय अधिकारी हजर झाले होते, मात्र ६ महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला.

मागे

मानखुर्द मध्ये महापिलिकेची पोटनिवडणूकही सेनेने जिंकली
मानखुर्द मध्ये महापिलिकेची पोटनिवडणूकही सेनेने जिंकली

          मुंबई - राज्यात सत्तेचं बळ मिळताच शिवसेनेला उभारी आली असून त्य....

अधिक वाचा

पुढे  

आंध्रप्रदेशात शालेय विद्यार्थांच्या आईच्या खात्यात वर्षाला १५,००० रुपये जमा होणार
आंध्रप्रदेशात शालेय विद्यार्थांच्या आईच्या खात्यात वर्षाला १५,००० रुपये जमा होणार

         आंध्रप्रदेश - राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी दारि....

Read more