ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

मुंबईत पकडले १ हजार कोटींचे ड्रग्ज, अफगाणिस्तानातून आलं हेरोईन

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2020 10:12 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत पकडले १ हजार कोटींचे ड्रग्ज, अफगाणिस्तानातून आलं हेरोईन

शहर : navi Mumbai

नवी मुंबईच्या पोर्टमधून हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. अफगाणिस्तानमधून इराणच्या माध्यमातून इथे ड्रग्ज आणण्यात आले होते. डायरेक्टोरेट ऑफ रेवेन्यू इंटेलीजन्स ( DRI) आणि कस्टम विभागाने संयुक्तरित्या ही कारवाई केली. तस्करांनी हे ड्रग्ज प्लास्टिक पाईपमध्ये लपवून ठेवले होते. हे आयुर्वेदीक औषध असल्याचे ते सांगत होते. ड्रग्ज इम्पोर्टचे कागदपत्र बनवणाऱ्या दोन कस्टम हाऊस एजंट्सना देखील अटक करण्यात आलीय. याशिवाय चार इतर इंपोर्टर आणि फायनान्सर्सना अटक करण्यात आलीयं. दोघांना आज मुंबईत आणलं जाणार आहे.

नेरुलचे एमबी शिपिंग आणि लॉजिस्टिक सॉल्यूशनचे कस्टम हाऊस एजंट मीनानाथ बोडके, मुंब्राचे कोंडीभाऊ पांडुरंग गुंजाळ यांना स्थानिक कोर्टात सादर केलं. इथून त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कस्टडीत पाठवण्यात आलंय. हे सर्वात मोठ ड्रग्ज रॅकेट आहे. याआधी अमृतसरमध्ये जानेवारीमध्ये पंजाब पोलिसांच्या एसटीएफने १९४ किलो हेरोइन पकडण्यात आलं होतं. याप्रकरणी जणांना अटक करण्यात आलं.

मोहम्मद नुमान नावाच्या इसमाने दिल्लीच्या सर्विम एक्सपोर्टच्या इंपोर्टर सुरेश भाटीयासोबत भेटवून दिल्याचे आरोपी बोडकेने पोलिसांना सांगितले. भाटीयाला याआधी देखील ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

मागे

वरळी, धारावीनंतर मुंबईतील 'हा' नवा हॉटस्पॉट
वरळी, धारावीनंतर मुंबईतील 'हा' नवा हॉटस्पॉट

वरळी, धारावी पाठोपाठ आता मुंबईत नवा कोरोनाचा हॉटस्पॉट तयार होत आहे. बीएमसीच....

अधिक वाचा

पुढे  

कर्नाटक प्रशासनाकडून ८ दिवसात महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन
कर्नाटक प्रशासनाकडून ८ दिवसात महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या प्रकरणानंतर आता कर्नाटक प्रश....

Read more