ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

वरुन पाऊस खालून भूकंप: पालघरवासीयांचे जीवन अत्यव्यस्त

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

वरुन पाऊस खालून भूकंप: पालघरवासीयांचे जीवन अत्यव्यस्त

शहर : पालघर

 

एकीकडे गेले काही दिवस पालघर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असतानाच काल रात्री 9.45 पासून मध्यरात्री दीड वाजेपर्यंत धुंडलवाडी, दापचरी, तलासरी, बोर्डी, डहाणू , बोईसर, कासा, झाई ते गुजरातच्या उंबरगाव पर्यंतच्या भागाला 7 ते 8 भूकंपाचे धक्के बसल्याने पालघरवासीय धास्तावले आहेत. काही ठिकाणी विज गायब झाली असल्याने स्थानिक रहिवाशी चिंताग्रस्त झाले आहे.

पालघर जिल्ह्यात मध्यरात्री 1 च्या सुमारास 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती आयएमडी ने दिली, तसे पाहिले तर रात्री 9.49 वाजता जिल्ह्यात 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर 12.33 ला 2.2 रिश्टर त्यानतर 3 मिनिटांनी 1.9 रिश्टर स्केल, 1.03 वाजता 3.8 रिश्टर स्केल, 1.06 ला व 1.12 ला असे 7 ते 8 भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अनेक स्थानिक रहिवासी घराबाहेर पडले. पण बाहेरही वीज गायब असल्याने सर्व अस्वस्थ होते.

मागे

शास्त्री, मुखर्जी व उपाध्याय त्यांच्या मृत्यूची चौकशी होणार नाही
शास्त्री, मुखर्जी व उपाध्याय त्यांच्या मृत्यूची चौकशी होणार नाही

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, भारतीय जनसंघाचे दीनदयाल उपाध्याय व डॉक....

अधिक वाचा

पुढे  

कोटीची जागा काही लाखात: 'ताज' वर अधिकारी मेहरबान
कोटीची जागा काही लाखात: 'ताज' वर अधिकारी मेहरबान

 मुंबईतील जगप्रसिद्ध 'ताज' हॉटेलने गेली 10 वर्ष मनमानी करून पार्किंग साठ....

Read more