ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उत्तर प्रदेशात पोलीस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्री, आठ पोलिसांचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 03, 2020 11:21 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उत्तर प्रदेशात पोलीस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्री, आठ पोलिसांचा मृत्यू

शहर : देश

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे गुन्हेगारांशी झालेल्या धुमश्चक्रीत आठ पोलिसांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर आणखी चार पोलीस गंभीररित्या जखमी झाले आहेत. येथील डिकरु गावात हा प्रकार घडला. काल रात्री पोलिसांचे एक पथक विकास दुबे या कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी गेले होते. सुरुवातीला पोलिसांच्या गाड्या अडवण्यासाठी गुंडांनी जेसीबी उभा करुन रस्ता अडवला. यानंतर पोलीस जेव्हा गाड्यांमधून बाहेर आले त्यावेळी जवळपास १५ ते १६ गुंडांनी छतावरून पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला.

पोलिसांकडून या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यात आले. मात्र, गुंड उंचावरुन गोळीबार करत असल्याने त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे आठ पोलिसांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उप पोलीस अधीक्षक देवेंद्र मिश्रातीन उपनिरीक्षक आणि चार कॉन्स्टेबलचा समावेश आहे.

या घटनेनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सध्या डिकरू गावात फॉरेन्सिक टीमही तपास करत आहे. याशिवाय, पोलिसांची अतिरिक्त कुमक गावात तैनात करण्यात आली आहे. विकास दुबेला शोधून काढण्यासाठी पोलिसांनी जवळपास १०० मोबाईल फोन ट्रेसवर टाकले आहेत. अनेकांची चौकशी करण्यात आली आहे.

दरम्यान, या चकमकीत जखमी झालेल्या चार पोलीस कर्मचाऱ्यांची प्रकृतीही गंभीर असल्याचे समजते. गुंडांनी चकमकीनंतर पोलिसांचे शस्त्रेही पळवून नेली आहेत. या घटनेमुळे उत्तर प्रदेशात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने या घटनेचा अहवाल मागवला आहे.

 

मागे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी तीन महिने पाच रुपयात शिवभोजन

लॉकडाऊन संपलेला असला तरी असामान्य परिस्थिती असल्यामुळे राज्यातील गोरगरीब....

अधिक वाचा

पुढे  

पुण्यात महिनाभरात तब्बल 32 हजार परप्रांतिय मजूर, नागरिक दाखल
पुण्यात महिनाभरात तब्बल 32 हजार परप्रांतिय मजूर, नागरिक दाखल

लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर पुण्यात येणाऱ्या परप्रांतिय नागरिक, म....

Read more