ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रविवार असला तरी शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होणार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 15, 2020 04:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रविवार असला तरी शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा होणार

शहर : पुणे

          २६ जानेवारी! सगळ्यांकरताच हा शुभ दिन आनंदाची पर्वणी असते. प्रजासत्ताक दिन महाविद्यालय, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसोबत संपूर्ण देशभर साजरा होतो. मात्र  यावर्षी प्रजासत्ताक दिवस महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा होणार असल्याने यादिवशी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहून झेंडावंदन, संचलन तसेच राष्ट्रीय संस्कृतिक कार्यक्रम सादर करावे लागणार आहेत. 


          महानगरपालिका शिक्षण विभागाने वर्ष २०२० साठी अंतरिम सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये प्रजासत्ताक दिन रविवारी तर स्वातंत्र दिन शनिवारी साजरा होणार आहे. यादिवशी शाळांना सुट्टी असते, मात्र यंदा यादिवशीही शाळेत विद्यार्थ्यांना हजर राहावे लागणार आहे.   

                                                                             

      दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मनावर राष्ट्रप्रेम, देशभिमानाच्या भावना रुजविण्यासाठी झेंडावंदन, संचलन, व इतर राष्ट्रीय संस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हे आदेश शिक्षण विभागाने राज्याच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसारच जारी केले आहेत असे मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी सांगीतले. त्यामुळे यावर्षीचा प्रजासत्ताक दिन रविवारी असला तरी सर्व शाळांमध्ये साजरा होणार आहे.  

मागे

लघुउद्योजकांसोबत ऍमेझॉन करणार १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक    
लघुउद्योजकांसोबत ऍमेझॉन करणार १ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक    

        नवी दिल्ली - लघु आणि मध्यम उद्योजकांच्या डिजिटलायझेशनसाठी ऍमेझॉ....

अधिक वाचा

पुढे  

चारशे होमेगार्ड बेरोजगार: दोन महिन्यांपासून रोजगार थकबाकी
चारशे होमेगार्ड बेरोजगार: दोन महिन्यांपासून रोजगार थकबाकी

        वर्धा - पोलिस यंत्रणेत कठीण प्रसंगात लोकांना सेवा पुरवणा-या होम....

Read more