ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

कोणतीही परीक्षा, मुलाखत न देता भारतीय डाक विभागात महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 27, 2021 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोणतीही परीक्षा, मुलाखत न देता भारतीय डाक विभागात महाराष्ट्रात नोकरीची सुवर्ण संधी

शहर : मुंबई

सरकारी नोकरीच्या शोधात आहात आणि तुमचे शिक्षण कमी आहे तरी काळजी करु नका. महाराष्ट्रात आणि बिहारमध्ये पोस्टात काम करण्याची सुवर्ण संधी भारतीय डाक विभागाने उप्लब्ध केली आहे. दोन्ही राज्यातील भरती प्रक्रिया 27 एप्रिलपासून सुरु झाली आहे. नोंदणीसाठी पुढील वेबसाईटवर क्लीक करा.  https://appost.in/gdsonline/home.aspx

माहाराष्ट्रातील जागा

महाराष्ट्रात ग्रामीण पोस्टमनच्या 2482 पदांवर भरती होणार आहे तर बिहार सर्कलमध्ये 1940 पदांवर भरती होणार आहे.

शिक्षणाची अट

कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून स्थानिक भाषा, इंग्रजी आणि गणिता विषयातून 10 वी पास होणे बंधनकारक आहे. त्याच बरोबर मान्यता प्राप्त संस्थेमधून 60 दिवसांचा बेसिक कंप्यूटर कोर्स करणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे वय हे कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे.

अर्ज शुल्क

ओपन, ओबीसी, ईडब्लूएस इ. वर्गासाठी 100 रुपये शुल्क, तर एससी, एसटी, महिलांसाठी कोणतेही शुल्क नाही.

वेतन

ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) - टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तासांसाठी 12 हजार रुपये

टीआरसीए स्लॅबमध्ये  5 तासांसाठी 14 हजार 500 रुपये असणार आहे

असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) किंवा डाक सेवक - टीआरसीए स्लॅबमध्ये 4 तासांसाठी 10 हजार रुपये. तर, टीआरसीए स्लॅबमध्ये  5 तासांसाठी 12 हजार रुपये असणार आहे.

निवडप्रक्रिया

GDS पदासाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. थेट 10वीच्या गुणांच्या आधारे ही प्रक्रिया होणार आहे.

 

 

मागे

SBIचं कार्ड असेल तर एटीएमची पायरी चढण्यास ४ वेळेस विचार करा, नाहीतर
SBIचं कार्ड असेल तर एटीएमची पायरी चढण्यास ४ वेळेस विचार करा, नाहीतर

गेल्या महिन्याच्या 11 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सतर्क अह....

अधिक वाचा

पुढे  

IT मंत्रालयाची सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस, नियमांचे पालन न केल्याचे कारणे द्या
IT मंत्रालयाची सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस, नियमांचे पालन न केल्याचे कारणे द्या

आयटी मंत्रालयाने सर्व सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस पाठवून बुधवारी विचारल....

Read more