ठळक बातम्या तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |     प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी.    |    

गॅस गळतीमुळे स्फोट; ६ महिन्याच्या चिमुकलीचा दर्दैवी मृत्यू

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 27, 2020 03:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गॅस गळतीमुळे स्फोट; ६ महिन्याच्या चिमुकलीचा दर्दैवी मृत्यू

शहर : पुणे

         पुणे : पुण्यातील संभाजी नगरामध्ये खराडी येथील एका घरात झालेल्या गॅस सिलेंडरच्या स्फोटात ६ महिन्याच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. आजूबाजूच्या परिसरात राहणार्‍या रहिवासी दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. आज सकाळी गॅस गळती झाल्यानंतर हा स्फोट झाला असून या स्फोटात जखमी झालेले बाळाच्या आईवडिलांची प्रकृती खूपच गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव स्वराली भवाळे असून तिच्या वडिलांचे नाव शंकर भवाळे (२८) व आईचे नाव आशाताई शंकर भवाळे (२२) असे आहे,  ते दोघेही या  दुर्घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.  

       आज सकाळच्या दरम्यान, आशाताई सकाळी झोपेतून उठल्यानंतर त्या पाणी तापवण्यासाठी स्वयंपाक घरात गेल्या असताना त्यावेळी शंकर भवाळे आणि सहा महिन्याची चिमुकली स्वराली झोपले होते. रात्रभर गॅस गळती झाल्याने घरात गॅस पसरला होता. त्यादरम्यान आशाताईंनी स्वयंपाक घरातील दिव्याचे बटण दाबल्याबरोबरच सिलेंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका प्रचंड होता की, या स्फोटामुळे चार खोल्यांवरील पत्रे उडाले. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत घराला लागलेली आग विझविली. मात्र तिघांनाही जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान  या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

 

मागे

मुंबईच्या लोकलमध्ये मराठी फलक
मुंबईच्या लोकलमध्ये मराठी फलक

           मुंबई : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये अलार्मचे सूचना फलक आता मर....

अधिक वाचा

पुढे  

१२ वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार राष्ट्रीय संरक्षण अकादमीत संधी
१२ वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार राष्ट्रीय संरक्षण अकादमीत संधी

      मुंबई : भारतीय संरक्षण दलात सेवा करण्याची महत्वाकांक्षा असणार्‍या....

Read more