ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

संतप्त शेतकऱ्यांकडून लालकिल्याची नासधूस, हिंसाचाराला जबाबदार कोण ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 27, 2021 07:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

संतप्त शेतकऱ्यांकडून लालकिल्याची नासधूस, हिंसाचाराला जबाबदार कोण ?

शहर : देश

शेतकऱ्यांचं कालचं रौद्र रुप संपूर्ण देशाने पाहिलं. प्रजासत्ताक दिनी लालकिल्ल्यात घुसून शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. नुसतं आंदोलनच नाही तर संतप्त शेतकऱ्यांनी लालकिल्ल्याची धासधुसही केली. किसान मोर्चाच्या नावाखाली शेतकरी संघटनांनी जोरदार धिंगाणा काल दिवसभर राजधानी दिल्लीत घातला.

लालकिल्ल्यावर आंदोलकांनी हल्लाबोल केल्यावर तिथे तैनात दिल्ली पोलिसांवर आंदोलकांनी तलवारी आणि दांडपट्टे घेऊन जोरदार हल्ला केला. अवघ्या 40 सेकंदात तब्बल 21 पोलीस किल्ल्याच्या भिंतीवरून 20 ते 25 फूट खोल खाली कोसळले. काही पोलिसांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला तर काही पोलीस खाली कोसळले.

या दंगेखोरांच्या हाती लाठ्या, तलवारी होत्या. सुरक्षा कर्मचाऱ्यांवर जोरदार लाठीहल्ला या आंदोलकांनी केला होता. आंदोलकांच्या संख्येपुढे पोलिसांची संख्या अगदीच कमी होती. त्यात अत्यंत आक्रमक झालेल्या आंदोलकांनी पोलिसांवर जोरदार हल्ला केला.

हाती शस्त्र असूनही केवळ परिस्थिती चिघळू नये म्हणून पोलिसांनी शस्त्राचा वापर केला नाही. मात्र आंदोलकांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे पोलिसांनी माघार घेतली यात पोलीस अक्षरशः खाली कोसळले.

मागे

शेतकरी आंदोलनात फूट, २ संघटनांची माघार
शेतकरी आंदोलनात फूट, २ संघटनांची माघार

दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनातल्या हिंसाचारासानंतर व्ही. एम.सिंग यांच्या शे....

अधिक वाचा

पुढे  

वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क? या आहेत 10 महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी
वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा किती हक्क? या आहेत 10 महत्त्वाच्या कायदेशीर तरतुदी

वडिलांच्या संपत्तीवर कुणाचा आणि किती हक्क यावरुन नेहमीच वाद होतात. अनेकदा ....

Read more