ठळक बातम्या दर रोज 30 मिनिटे पायी चालण्याचे फायदे कळल्यावर कधीच कंटाळा करणार नाही.    |     थंड हवामानात निरोगी राहण्यासाठी या 5 गोष्टी लक्षात ठेवा.    |     मद्यपानाची सवय सोडण्यासाठी उपाय.    |     Tulsi Vivah 2020: अशी सुरु झाली तुळशी विवाहाची परंपरा, यंदा 'हा' आहे मुहुर्त.    |     धनतेरसला धणे का विकत घेतात? जाणून घ्या.    |    

Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात अपयश, ५ डिसेंबरला पुन्हा बैठक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 04, 2020 11:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Farmers Protest : शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यात अपयश, ५ डिसेंबरला पुन्हा बैठक

शहर : देश

शेतकरी आंदोलनावर (Farmers Protest) तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. शेतकरी (farmer) नेत्यांची सरकार सोबतची बैठक संपली. या बैठकीतून कोणताही निर्णय झाला नाही. आता शेतकऱ्यांची भूमिका अधिक कठोर झाली आहे. केंद्र सरकार आणि आंदोलन करणाऱ्या शेतकरी संघटनांच्या (Farmers protest delhi) नेत्यांमधली बैठक संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या सुमाराला संपली. मात्र या बैठकीतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. आता ५ डिसेंबरला पुन्हा बैठक होणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी सांगितले. त्या बैठकीत इतर मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच एपीएमसी मजबूत करण्यासाठी काम करणार असल्याचे आश्वासनही तोमर यांनी यावेळी दिले. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. आज झालेल्या शेतकऱ्यांसोबतच्या चौथ्या फेरीतही तोडगा काढण्यात अपयश आले. नवा कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम असल्यामुळे हा तिढा वाढतच चालला आहे. मात्र आजच्या बैठकीत काही मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याचे केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले. शेतकरी आंदोलनाचा आजचा आठवा दिवस आहे.

दिल्लीतील विज्ञान भवनात सरकार आणि शेतकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत एकूण ४० शेतकरी संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि पियूष गोयल बैठकीला उपस्थित होते. तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शाह आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यातही चर्चा झाली.

 

मागे

किल्ले रायगडची रोप वे सेवा आजपासून सुरू
किल्ले रायगडची रोप वे सेवा आजपासून सुरू

किल्‍ले रायगडावर येणारे शिवभक्‍त आणि पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. किल....

अधिक वाचा

पुढे  

बळीराजाचा संयम सुटला; शेतकऱ्यांची येत्या 8 डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक
बळीराजाचा संयम सुटला; शेतकऱ्यांची येत्या 8 डिसेंबर रोजी 'भारत बंद'ची हाक

गेल्या नऊ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा ....

Read more