ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

ऑस्ट्रेलियात भीषण आग; ५० कोटी प्राण्यांचा होरपळून मृत्यू

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 06, 2020 12:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ऑस्ट्रेलियात भीषण आग; ५० कोटी प्राण्यांचा होरपळून मृत्यू

शहर : विदेश

        सिडनी - गतवर्षी अॅमेझॉन जंगलाला लागलेल्या आगीनंतर आता ऑस्ट्रेलियातील जंगलात भीषण आग लागली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी आग आहे. गेल्या 4 महिन्यांपासून ही आग धगधगत आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 13 जानेवारीपासून 4 दिवसीय भारत दौरा रद्द केला आहे.  स्कॉट मॉरिसन म्हणाले की, सध्या देशात आगीचा वणवा भडकला आहे. या संकटात आमचे लक्ष देशातील लोकांना मदत करण्याकडे आहे. काही लोकांची सुखरूप सुटका झाली असून काही अजुनही आगीशी झुंज देत आहेत.

       युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकॉलॉजिस्टच्या अंदाजानुसार या आगीमुळे आतापर्यंत 18 लोकांचा आणि जवळपास 5 कोटी प्राण्यांना जीव गमावावा लागला आहे. न्यू साऊथ वेल्सच्या मध्य उत्तर भागात सर्वाधिका प्राणी आहेत. या भागालाही आगीने वेढले आहे. किनाऱ्याकडे वेगाने पसरणाऱ्या या आगीमुळे आतापर्यंत 200 हून अधिक घरांचे नुकसान झालं आहे. काही लोक आगीच्या वेढ्यात अडकले आहेत.

      ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स स्टेटमध्ये पहिल्यांदा आग लागली. राजधानी मेलबर्न आणि सिडनी याच राज्यात समुद्र किनाऱ्यावर आहेत. इथं 70 लाख लोक राहतात. वेल्सनंतर आग विक्टोरियापर्यंत पोहचली. गेल्या आठवड्यात मल्लकूटातील जंगलाला आगा लागली. यामुळे शहरातील 4 हजार लोकांना स्थलांतर करावं लागलं. जवळपास 1.23 कोटी एकर क्षेत्र आगीत भस्मसाथ झालं आहे.