ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

उंब्रज-सेवा महामार्ग रोडवर भीषण आग : दुकान जळून खाक

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 20, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

उंब्रज-सेवा महामार्ग रोडवर भीषण आग : दुकान जळून खाक

शहर : सातारा

         उंब्रज बस स्थानकाजवळ सेवा महामार्गालगत असलेल्या दुकानाला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत बरीचशी दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सैनिक बँक समोर असलेल्या फूटवेअर दुकानाला रात्री १० च्या सुमारास अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये दुकान जळून खाक झाले आहे. या आगीमध्ये आजूबाजूच्या दुकांनाना याचा फटका बसला आहे.

          शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत महाराष्ट्र फूटवेअर, जनेरियल मेडिकल, बेकरी, वडापाव, आणि चहा सेंटर १ लाखापर्यंत नुकसान झाल्याची माहिती माध्यमातून समजली आहे. स्थानिक युवकाला याची माहिती लागताच त्वरित उंब्रज पोलिसांना याची माहिती दिली. त्वरित उंब्रज पोलिसांनी सेवा महामार्गावरील सुरू असलेल्या सर्व वाहतूक थांबवण्यात आली. 

         तिथल्या स्थानिक रहिवाश्यांनी आग विझवण्यासाठी ताबडतोब पाण्याचे टँकर मागवण्यात आले. सुमारे १ तासानंतर युवक आणि स्थानिक लोकांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली, सुदैवाने या अचानक लागलेल्या आगीत जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.          

मागे

अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी
अभिनेत्री शबाना आझमी कार अपघातात जखमी

         पिंपरी : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाक्याज....

अधिक वाचा

पुढे  

जगातील सर्वात कमी उंचीच्या व्यक्तीचे निधन 
जगातील सर्वात कमी उंचीच्या व्यक्तीचे निधन 

       नेपाळ - जगातील सर्वात कमी उंचीचा व्यक्ती खगेंद्र थापाचे नुकतेच ....

Read more