ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

बेस्ट फाइव्हऐवजी आता फर्स्ट फाइव्ह; शालेय शिक्षण विभागाचा नवीन बदल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 22, 2019 11:24 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बेस्ट फाइव्हऐवजी आता फर्स्ट फाइव्ह; शालेय शिक्षण विभागाचा नवीन बदल

शहर : मुंबई

अकरावी प्रवेशांमध्ये होणारे बदल काही थांबण्याचे नाव घेत नाहीत. एकीकडे अकरावीच्या ९८ महाविद्यालयांत जागा वाढविण्यात आल्या. मात्र, अद्याप अकरावीच्या एकूण जागा घोषित करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पालक त्रस्त आहेत. आता दुसरीकडे आयसीएसईच्या पालकांची चिंता वाढविणारा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शिक्षण विभागाच्या नवीन परिपत्रकानुसार, आता अकरावीच्या प्रवेशासाठी आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ग्राह्य धरताना, पहिल्या पाच विषयांचे गुण ग्राह्य धरण्यात येतील. यासंबंधित निर्देश उपसंचालकांना दिले असून, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे संगितले जात आहे. मात्र, याचा फटका आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना बसणार आहे.

मुळातच सीबीएसई आणि आयसीएसई मंडळाची गुणपद्धती ही राज्य मंडळापेक्षा वेगळी आहे. त्यातही राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण कमी केल्याचा फटका विद्यार्थ्यांना निकालाच्या रूपात बसला आहेच, शिवाय इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत गुणांत होणारी पीछेहाट, यामुळे अकरावी प्रवेशदरम्यानही त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

या पार्श्वभूमीवर आयसीएसई मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील विषयांपैकी सरासरीसाठी सर्वोत्तम विषयांतील गुण ग्राह्य धरले जात होते. आता त्याऐवजी फक्त पहिल्या विषयांतील गुण सरासरीसाठी ग्राह्य धरले जातील. यासंबंधित आवश्यक निर्देश शिक्षण विभागाच्या सहसचिव सुवर्ण खरात यांनी १९ जून रोजी जारी करण्यात आले आहेत.

अकरावी प्रवेश निश्चित करू इच्छिणाऱ्या कोणत्याही मंडळाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होता, सर्वांना समान संधी मिळावी, यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.

निकालाचा टक्का नव्याने घसरला

परिपत्रकातील नवीन बदलामुळे आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनाही चांगले महाविद्यालय मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. आयसीएसईच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिकेत असणाºया सहा विषयांपैकी एक विषय हा विशेष विषय असून, काहींना त्यात सर्वोत्तम गुण प्राप्त आहेत. मात्र, नवीन बदलामुळे पहिल्या पाचच विषयांचे गुण ग्राह्य धरण्यात येणार असल्याने, आपल्याला उत्तम गुण असणारे विषय क्रमनिहाय सहाव्या क्रमांकावर गेल्याने त्यांची निकालाची टक्केवारी घसरत आहे. याचा फटका त्यांना अकरावीच्या प्रवेशाच्या वेळी होणार असल्याची माहिती उपसंचालक कार्यालयात आलेल्या विद्यार्थी, पालकांनी दिली.

अर्जात करावा लागणार बदल

अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या आॅनलाइन पद्धतीमधील आयसीएसईच्या अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्या टप्प्यात अर्ज दाखल करताना, विद्यार्र्थ्यांनीबेस्ट आॅफ फाइव्ह गुणांची नोंदणी केली, तसेच बुधवारी आॅनलाइन प्रक्रिया सुरू झाल्यानंतर, अनेक विद्यार्थ्यांनी दुसºया टप्प्यातहीबेस्ट आॅफ फाइव्ह गुणांची नोंद केली. मात्र, आता ज्या विद्यार्र्थ्यांनी पहिल्या, तसेच दुसºया टप्प्यामध्येबेस्ट आॅफ फाइव्हप्रमाणे अर्ज भरले आहेत, त्यांना आपल्या शाळेत जाऊन आधीच्या गुणांमध्ये बदल करून, गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांच्या गुणांची नोंद करावी लागणार आहे.

मागे

उस्मानाबादच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे संतापले
उस्मानाबादच्या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजे संतापले

'आरक्षण गेलं खड्ड्यात! पदवीपर्यंत सर्वच जातीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण ....

अधिक वाचा

पुढे  

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर आता बंदी?
दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर आता बंदी?

दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर राज्य सरकार बंदी घालण्याची शक्यता आहे. पुढी....

Read more