ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2020 09:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

शहर : मुंबई

महाराष्ट्रामध्ये विकासाच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात या विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली. (First International Sports University in Maharashtra)

विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात आले आणि त्यास दोन्ही सभागृहाने एकमताने मंजुरी दिली, असल्याने येत्या शैक्षणिक वर्षापासून या विद्यापीठात प्रवेश प्रक्रियेसह अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री सुनिल केदार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विद्यापीठ स्थापनेनंतर प्रथम वर्षी स्पोर्टस सायन्स, स्पोर्टस टेक्नॉलॉजी व  स्पोर्टस कोचिंग व ट्रेनिंग हे 3 अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. याकरिता प्रत्येक अभ्यासक्रमात 50 विद्यार्थी प्रवेश संख्या निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर पुढील वर्षामध्ये मागणीनुसार व आवश्यकतेनुसार आणखी अभ्यासक्रम सुरु करता येतील, असं सुनील केदार यांनी सांगितलं.

शारीरिक शिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा प्रशासन, क्रीडा व्यवस्थापन, क्रीडा माध्यम व कम्युनिकेशन, क्रीडा प्रशिक्षण यामध्ये शिक्षणाच्या व नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, क्रीडा क्षेत्रातील तांत्रिक मनुष्यबळ देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल. शारीरिक शिक्षण, क्रीडा शिक्षण यामध्ये संशोधन व विकास चांगल्या प्रकारे होईल, असेही त्यांनी सांगितलं.

राज्यात सध्या पुणे जिल्ह्यातील बालेवाडी येथे शिवछत्रपती क्रीडा संकुल सुरु आहे. या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. यामुळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे कार्यान्वित करण्यात येणार आहे, असं केदार यांनी सांगितले.

मूलभूत सुविधासंह अद्ययावत असलेल बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल यासाठी योग्य आणि केंद्र शासनाच्या मानकांची पूर्तता करणारे आहे. या पार्श्वभूमीवर बालेवाडी येथे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी तात्काळ कार्यवाही सुरू करण्यास वाव असल्याने या ठिकाणास प्राधान्य देण्यात आले आहे. टप्प्या- टप्प्यात मराठवाडा व विदर्भातही विद्यापीठ स्थापन करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, या अनुषंगाने राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले.  

मागे

Maratha Reservation | मराठा समाजाशी संबंधित दोन मोठ्या बातम्या
Maratha Reservation | मराठा समाजाशी संबंधित दोन मोठ्या बातम्या

मराठा समाजाशी (Maratha Reservation) संबंधित दोन मोठ्या बातम्या आहेत. राज्यात ग्रामपंचाय....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यांना लोकलची मुभा
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, यांना लोकलची मुभा

कोविड-१९च्या (Covid-19) पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवासासाठी (Railway travel) काही बंधने आजही ....

Read more