ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात पाच ठार, पाच जखमी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 16, 2021 08:45 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात पाच ठार, पाच जखमी

शहर : lonavla

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात ( Mumbai-Pune expressway accident) झाला. या अपघातात पाच जण ठार, पाच जण जखमी झालेत. ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर चार वाहनांना धडकल्याने हा मोठा अपघात झाला. मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर रात्री साडेबाराच्या सुमारास खालापूर टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. या अपघातात तीन महिला आणि एका लहान मुलाचा तसेच एका पुरुषाचा समावेश आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Five killed, five injured in Mumbai-Pune expressway accident)

ब्रेक निकामी झाल्याने कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कंटेनर पुढे चाललेल्या चार गाड्यांवर आदळला. यात कंटेनरसह दोन करा आणि एक टेम्पो आणि ट्रक या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातग्रस्त दोन कारमधील कुटुंबीय एकत्र पुण्याला एका कार्यक्रमाला गेलो होते. ते परतत असताना हा अपघात झाला आहे. दरम्यान, त्यांच्यासोबत आणखी दोन कार होत्या. परंतु मुबंईकडे जाताना दोन कार पुढे निघून गेल्या. मात्र, दोन कारना अपघात झाला.

अपघातातील मृतांची नावे

1.मंजू प्रकाश नायर - 58 , रा. गोरेगाव मुंबई

2. डॉ. वैभव वसंत झुंजारे - वय 41 , रा. नेरुळ नवी मुंबई 

3. उषा झुंजारे वय - 63 , रा . नेरुळ नवी मुंबई

4. वैशाली वैभव झुंजारे वय 38 रा. नवी मुंबई

5.  श्रिया वैभव झुंजारे वय 5 रा. नेरुळ नवी मुंबई

अपघातातील जखमींचे नावे

1. स्वप्नील कांबळे वय 30 , रा. गोरेगाव मुंबई

2. प्रकाश नाहर , वय 65 रा. गोरेगाव मुंबई

3. अर्णव झुंजारे वय 15 रा. नेरुळ नवी मुंबई

4. किशन चौधरी , गंभीर जखमी

5. काळूराम जाट , गंभीर जखमी

 

मागे

कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक
कोरोनाने पुन्हा चिंता वाढवली, मुख्यमंत्र्यांनी बोलावली आज महत्त्वाची बैठक

कोरोनाची (Coronavirus) राज्यातली वाढती संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ....

अधिक वाचा

पुढे  

देशातील या ४ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता
देशातील या ४ बँकांचे खासगीकरण होण्याची शक्यता

देशातल्या चार सार्वजनिक बँकांच्या खासगीकरणाच्या हालचाली सुरू झाल्य़ा आहेत....

Read more