ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माझी पोलिस संचालक अरविंद इनामंदार यांचे निधन

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 08, 2019 09:10 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माझी पोलिस संचालक अरविंद इनामंदार यांचे निधन

शहर : मुंबई

महाराष्ट्रचे माजी प्लीस महासंचालक अरविंद इनामदार यांचे मुंबईतील हरकिसनदास रुग्णालयात पहाटे अडीचच्या सुमारास निधन झाले ते 79 वर्षांचे होते. अरविंद इनामदार यांची प्रामाणिक, न्यायप्रिय आणि कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी अशी ओळख होती. त्यांनी नाशिकमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दीर्घकाळ काम केले. जळगाव सेक्स स्कँडल प्रकरण त्यांनी यशस्वीपणे हाताळले होते. पोलिस खात्यातील आयोग व चुकीच्या गोष्टींवर त्यांनी वारंवार हल्ला चढवला होता. त्यामुळेच ते सतत चर्चेत असत. या सदगुणांचा मोठा फटका आपल्याला बसला असे त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले.

अरविंद इनामदार 1 ऑक्टोबर 1997 ते 5 जानेवारी 2000 या काळात राज्याचे पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी सरकारच्या निर्णयातही ते विरोध करीत असत. अखेर एक वर्ष आधीच त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. पोलिस खात्यात असले तरी ते अतिशय संवेदनशील होते. साहित्य वर्तुळातही त्यांचा वावर होता. पोलिस लेखक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. खुसखुशीत भाषा शैली आणि विवेकबुद्धीमुळे ते ऐकणार्‍यांच्या मनाची सहज पकड घेत असत. त्यांच्यावर भगवतगीतेचा मोठा प्रभाव होता. गिरगावातील चंदनवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मागे

छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अमिताभ बच्चन सोशल मीडियावर ट्रोल
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख अमिताभ बच्चन सोशल मीडियावर ट्रोल

अमिताभ बच्चन 'कौन बनेगा करोडपती'मध्ये त्यांच्या संयत सूत्रसंचालनाच्या ....

अधिक वाचा

पुढे  

सर्व रुग्णालयात निवडक आजारांवर उपचाराचे दर समान केले जाणार
सर्व रुग्णालयात निवडक आजारांवर उपचाराचे दर समान केले जाणार

यापुढे रुग्णालयांना आणि वेगवेगळ्या विमा कंपन्या समान उपचार दर ठेवणे आवश्य....

Read more