ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सुंदर पिचाईंना १४ कोटींची पगारवाढ! तर महिना पगार...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 21, 2019 04:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सुंदर पिचाईंना १४ कोटींची पगारवाढ! तर महिना पगार...

शहर : मुंबई

                मुंबई - भारतीय-अमेरिकन वंशाचे 'गुगल' आणि 'अल्फाबेट' या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांना कंपनीने तब्बल २ दशलक्ष डाॅलर्स (१४ कोटी रुपये) इतकी पगारवाढ दिली आहे. 'सीएनबीसी' या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार सुंदर पिचाई यांची टेक होम सॅलरी यंदा २ दशलक्ष डाॅलर्सने वाढणार आहे. त्याशिवाय पिचाई यांना १२० दशलक्ष डाॅलर्सचे शेअर्ससुद्धा दिले जातील.


             नुकताच गुगलचीच मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाची जबाबदारी सुंदर पिचाई यांच्यावर सोपवण्यात आली. या जबाबदारीसोबतच सुंदर पिचाई आता जगातील सर्वात शक्तीशाली कॉर्पोरेट व्यक्तीमत्व बनले आहेत. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज आणि सर्गे ब्रिन यांनी अल्फाबेटची धुरा पिचाई यांच्यावर सोपवली आहे. अल्फाबेटने युनायटेड स्टेटस सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनला दिलेल्या माहितीनुसार पिचाई यांना १२० दशलक्ष डाॅलर्सचे शेअर्ससुद्धा (स्टाॅक आॅप्शन) दिले जातील. 


            'गुगल'च्या अहवालानुसार सुंदर पिचाई यांचे वार्षिक सॅलरी पॅकेज ६ लाख ५० हजार डॉलर आहे. यात झपाट्याने वाढ होत आहे. या अहवालात १२० दशलक्ष डाॅलर्सच्या शेअर्सचा पिचाई यांना कशा प्रकारे लाभ मिळणार याचीदेखील माहिती देण्यात आली आहे. तसेच पिचाई यांना प्रोत्साहन भत्त्यापोटी ४५ दशलक्ष डाॅलर्स मिळणार आहेत. २०१४ पासून पिचाई यांना स्टाॅक आॅप्शनमधून ५५० दशलक्ष डाॅलर्स मिळाले आहेत. पिचाई यांना २०१५ साली ६ लाख ५२ हजार ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर एवढा पगार मिळाला होता.


                 जगातील आघाडीची कंपनी असलेल्या 'गुगल'चे भारतीय वंशाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी वार्षिक पगाराच्या बाबतीत एक नवं शिखर गाठलं आहे. पिचाई यांना २०१६ या वर्षांत पगार व अन्य भत्त्यांच्या स्वरूपात तब्बल १२.८५ अब्ज रुपये मिळाले आहेत. आधीच्या वर्षाच्या तुलनेत ही रक्कम दुप्पट असून सरासरी काढल्यास महिन्याला त्यांना १०० कोटी मिळाले आहेत.
 

मागे

भारतीय सैन्यदल प्रमुखपदी 'या' मराठी अधिकाऱ्याची वर्णी
भारतीय सैन्यदल प्रमुखपदी 'या' मराठी अधिकाऱ्याची वर्णी

केंद्र सरकारने विजय दिनाचं आचौत्य साधत पुढच्या भारतीय सैन्यदलप्रमुखाची न....

अधिक वाचा

पुढे  

अर्जूना नदीपात्रातून प्रकटला श्रीगणेशा.. उत्खननात सापडली पुरातन मूर्ती!
अर्जूना नदीपात्रातून प्रकटला श्रीगणेशा.. उत्खननात सापडली पुरातन मूर्ती!

               रत्नागिरी - पुलाच्या बांधकामासाठी नदीत खोदकाम करताना ....

Read more