ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

धुळ्यामध्ये गॅसचा स्फोट, चौघे जण जखमी

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 01:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

धुळ्यामध्ये गॅसचा स्फोट, चौघे जण जखमी

शहर : धुळे

धुळ्यामधील देवपूरमधील गल्ली नंबर 7 एकवीरा देवी मंदिराजवळील एका घरात अचानक गॅसचा स्फोट झाला. ही घटना सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास घडली़  यात चार जणं भाजले गेल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़  स्वयंपाक करीत असताना गॅसचा भडका उडाल्याने सर्वांची धांदल उडाली़  मदतीसाठी या भागातील नागरीकांनी धाव घेतली़  निर्मलाबाई लालचंद भोई (50), अक्षय लालचंद भोई (28), विष्णू लालचंद भोई (33) आणि सुधाकर ज्ञानेश्वर जोशी (40) हे चौघे भाजले गेल्याने त्यांना खासगी वाहनाने सुदाम परशुराम भोई यांनी तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे़ त्यांच्यावर उपचार सुरु आहे़ अक्षयतृतीया सणाच्या दिवशीच अशी घटना घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे़

मागे

मुंबई महानगरात 2 लाख 83 हजार फ्लॅट्स विक्रीअभावी पडून
मुंबई महानगरात 2 लाख 83 हजार फ्लॅट्स विक्रीअभावी पडून

2 लाख 83 हजार सदनिका विक्रीअभावी तशाच पडून आहेत. बांधकाम क्षेत्राला तेजी येईल ....

अधिक वाचा

पुढे  

ब्रिटनच्या शाही घराण्यात आला नवा राजपुत्र
ब्रिटनच्या शाही घराण्यात आला नवा राजपुत्र

प्रिन्स हॅरीची पत्नी डचेज ऑफ ससेक्स मेगन मर्केल हिला मुलगा झाला आहे. सोमवार....

Read more