ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

पालघरमध्ये झोपाळ्यावरून पडून मुलीचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पालघरमध्ये झोपाळ्यावरून पडून मुलीचा मृत्यू

शहर : पालघर

पालघरमध्ये उद्यानातील झोपाळ्यावरून पडून एका 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना सोमवारी सकाळी घडली. रविना भुरिया असे त्या मुलीचे नाव असून झोपाळ्यावरून खाली पडल्याने रविनाच्या छातीला जोरात मार लागल्याने तिचा मृत्यू झाला आहे.
पालघर पोलिसांच्या माहितीनुसार, नवलीमध्ये राहणारी रविना सोमवारी सकाळी लहान भावासोबत नगरपरिषदेच्या उद्यानात खेळण्यासाठी गेली असता उद्यानातील झोपाळ्यावर ती झोके घेत होती. खेळता खेळता  तिचा तोल जाऊन ती खाली छातीवर पडली. कशीबशी ती उठली आणि भावाला घेऊन घरी गेली. घरी पोहोचल्यानंतर ती अचानक खाली कोसळली. त्यावेळी तिचे पालक घरी नव्हते. रविना घरात पडल्यामुळे भावाने मदतीसाठी आरडाओरडा केला. शेजार्‍यांनी धाव घेत रविनाला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित केले. तिचा मृतदेह विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. रविनाच्या छातीला जबर मार लागल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

मागे

राज्यात स्वाइनची दहशत कायम; १२० जणांचा बळी
राज्यात स्वाइनची दहशत कायम; १२० जणांचा बळी

वातावरणात बदल होत असल्याने राज्यात स्वाइन फ्लूची दहशत कायम आहे. जानेवारी त....

अधिक वाचा

पुढे  

देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकांना  आहे- हमीद अन्सारी
देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकांना आहे- हमीद अन्सारी

देशाचे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींनी बालाकोट एअर स्ट्राइकवर नागरिकां....

Read more