ठळक बातम्या आपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा ? तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा.....    |     तिखट भाकरी.    |     शेवभाजी.    |     मनाला शांती हवी असेल तर क्रोध आणि लोभापासून दूर राहावे.    |     कुटुंबातील मोठ्या लोकांच्या अनुभवातून आपण मोठमोठ्या अडचणींपासून दूर राहू शकते.    |    

सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 29, 2020 10:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सोन्या-चांदीच्या दराने गाठला उच्चांक

शहर : देश

सोन्याच्या दरात मोठी उसळी आली असून २४ कॅरेट गोल्डच्या भावात ऐतिहासिक वाढ झाली आहे. सोन्याचा आजचा दर हा ५३,००० रुपये आहे. तर चांदीचा आजचा दर हा ६५,००० प्रति किलो आहे.

देशभरात सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर हा सोमवारी १५६ रुपये प्रति १० ग्रॅम उघडला तर ९६ रुपयाने वाढून ५२,४६५ रुपये बंद झाला आहे. तर चांदीचा दर हा थोडा कमी झाला आहे. १७७५ रुपये प्रति किलो नुकसान होऊन ६२,७३० रुपये इतका आता आहे.

इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २८ जुलै २०२० रोजी देशभरात सराफा बाजारात सोने-चांदीचा दर खालील प्रमाणे

२४ कॅरेट सोन्याचा दर हा ५२,४६५ प्रति १० ग्रॅम आहे. तर २३ कॅरेटचा दर हा ५२,२५५ रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर हा ४८,०५८ इतका आहे. तर १८ कॅरेटचा सोन्याचा दर हा ३९३४९ इतका आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर कमी होत दिल्ली सराफा बाजारावर याचा परिणाम झाला. मंगळवारी सोन्याचा दर १८७ रुपयांनी कमी झाला असून आता १० ग्रॅम सोने हे ५२,८४६ रुपये इतका आहे

कोरोनाच्या संकटातही सोन्या-चांदीचा दर वाढत आहे. या संकट काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे पाहिले जात आहे. मौल्यवान धातूंची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मागणी वाढत असून पुरवठा नसल्याने सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

मागे

मुंबईत अवघ्या 30 लाखात घर, ठाकरे सरकारची योजना, ऑक्टोबरमध्ये भूमीपूजन?
मुंबईत अवघ्या 30 लाखात घर, ठाकरे सरकारची योजना, ऑक्टोबरमध्ये भूमीपूजन?

मुंबईत छोटं का होईना पण घर असावं, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. याच पार्श्वभू....

अधिक वाचा

पुढे  

ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी ५०० नव्या रुग्णवाहिका
ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांसाठी ५०० नव्या रुग्णवाहिका

राज्यातील ग्रामीण भागांमधील रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये व....

Read more