ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Googleचा चीनला झटका, २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स केले डिलीट

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2020 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

Googleचा चीनला झटका, २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स केले डिलीट

शहर : विदेश

चीन विरोधात भारताने आक्रमकपणा घेतल्यानंतर अमेरिकाही अधिक आक्रम झाली आहे. भारतानंतर अमेरिकेने चीनच्या TikTok वर बंदी घातली. आता गूगलने (Google) चीनला चांगला दणका दिला आहे. गूगलने चीनची २५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केली आहेत. त्यामुळे चीनला याचा मोठा फटका बसणार आहे.

गूगलकडून सांगण्यात आले आहे की, चीनशी संबंधित२५०० पेक्षा जास्त यूट्यूब चॅनेल्स डिलीट केले आहेत.  चुकीच्या आणि खोट्या बातम्या पसरवत असल्याचे कारण देत गूगलकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

गूगलने हटविलेले यूट्यूब चॅनेल्स स्पॅमी आणि बिगर राजकीय कंटेन्ट पोस्ट करत होते. तसेच, यामधील काही भाग राजकारणाशी संबंधित होता. दिशाभूल करणारे व्हिडिओ चीनने यूट्यूब प्लॅटफॉर्मवर शेअर केल्याचे कारण देत गूगलने हा व्हिडिओ स्ट्राईक करत २५०० हून अधिक चॅनेल डिलिट केले आहेत.

चॅनेल्स तपासणीच्या कामादरम्यान गूगलला काही व्हिडिओ चॅनेल संदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर गूगलने योग्य ती खातरजमा करुन एप्रिल ते जून या तिमाहीत हे यूट्यूब चॅनेल हटवले आहेत. आपल्या तिमाही अहवालात गूगलने यासंदर्भात माहिती दिली आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर अमेरिका आणि चीनमधील संबंध बिघडले गेले आहेत. मतभेद अगदी टोकाला गेले आहेत. त्यामुळे भारतानंतर अमेरिकेने चीनच्या  TikTok वर बंदी घातली होती. तसेच अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यापार्श्वभूमीवर अमेरिकेकडून खबरदारी घेण्यात आली आहे.

मागे

‘गुगल’ क्लासरुम सुरु करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य
‘गुगल’ क्लासरुम सुरु करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याच....

अधिक वाचा

पुढे  

राम मंदिर : शिवसेनेने ओवेसी यांना खडसावले, आता रडणे बंद करा!
राम मंदिर : शिवसेनेने ओवेसी यांना खडसावले, आता रडणे बंद करा!

अयोध्ये राम मंदिर उभे राहत आहे. राम मंदिर हे संविधानेचे राष्ट्रीय प्रतिक अस....

Read more