ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

PAYTM | पेटीएम युजर्सला धक्का, गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम अ‍ॅप हटवले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 18, 2020 03:43 PM 2019-02-12T14:15:30+5:30

PAYTM | पेटीएम युजर्सला धक्का, गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम अ‍ॅप हटवले

शहर : देश

डिजीटल व्यवहारातील अग्रगण्य समजलं जाणारे पेटीएम ॅप गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. यामुळे आता गुगल प्ले स्टोअरवरुन पेटीएम डाऊनलोड करता येणार नाही. यामुळे लाखो पेटीएम युजर्सला धक्का बसला आहे. पेटीएमने गुगलच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्याने हे ॅप्लिकेशन हटवण्यात आल्याचे सांगितलं जात आहे.

गुगल प्ले स्टोअरने दिलेल्या माहितीनुसार, पेटीएमने गुगलच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे पेटीएमचे ॅप्लिकेशन हटवण्यात आले आहे. ऑनलाईन जुगार किंवा विविध खेळांवरील सट्टेबाजीला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही ॅपची आम्ही जाहिरात किंवा प्रमोशन करु शकत नाही. त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही ॅप जे रोख बक्षिसे किंवा पैसे जिंकण्याबाबतची आश्वासन देतात, त्यांची जाहिरात आम्ही करत नाही, असे निवेदन गुगलने जारी केले आहे.त्यामुळे पेटीएमचे ॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवरुन हटवण्यात आले आहे. सद्यस्थितीत गुगलच्या प्लेस्टोअरमध्ये पेटीएमचे ॅप्लिकेशन पाहायला मिळत नाही. त्यामुळे ते डाऊनलोडही करता येणार नाही. मात्र पेटीएमशी संबंधित इतर पेटीएम बिझनेस, पेटीएम मनी, पेटीएम मॉल हे ॅप प्ले स्टोअरवर अद्याप कायम आहेत. ते हटवण्यात आलेले नाही.

पुढे  

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच : उदयनराजे
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा लागला तर मी देणारच : उदयनराजे

"मी कधी राजकारण करत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा ला....

Read more