ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘फॅनी’ चक्रीवादळमुळे राज्यात उष्णतेची लाट

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 03, 2019 02:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

‘फॅनी’ चक्रीवादळमुळे राज्यात उष्णतेची लाट

शहर : मुंबई

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘फॅनी’ चक्रीवादळाचा प्रभाव राज्यावर होऊन उष्णतेची लाट आली होती. हे वादळ दोन दिवसांमध्ये जमिनीवर येणार असून, तीव्रता कमी होऊन ते नष्ट होईल. त्यानंतर राज्यातील उन्हाचा कहर कमी होईल. कमाल आणि किमान दोन्ही तापमान सरासरीच्या आसपास राहतील, अशी माहिती हवामान शास्त्रज्ञ आणि इंडियन मेट्रोलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष जीवनप्रकाश कुलकर्णी यांनी दिली.

कुलकर्णी म्हणाले, की जागतिक तापमानवाढीचा (ग्लोबल वॉर्मिग) परिणाम सर्वत्र जाणवतो आहे. देशातील हवामानातही काही बदल झाले आहेत. यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र झाला आहे. शहरीकरण, पर्यावरणाचा र्‍हास, वृक्षतोड आदींमुळेही कमाल तापमानात वाढ होते आहे. 24 ते 28 एप्रिलला राज्यात तापमान वाढले. ते 29 एप्रिलपासून कमी होत आहे. चक्रीवादळ नष्ट झाल्यानंतर ते सरासरीच्या आसपास येईल.
भारतीय हवामान विभागाच्या वतीने तालुकास्तरावरील हवामानाच्या बदलांचा अभ्यास करून अंदाज वर्तविण्यात येत आहे. मात्र, ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत, असा दावा करून कुलकर्णी म्हणाले, की हवामान विभागासह राज्यात आणि देशात सध्या खासगी हवामान संस्थांनी काम सुरू केले आहे. त्याचा फायदा नागरिक आणि शेतकर्‍यांना होऊ शकतो.

मागे

वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांचा हल्ला
वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या 200 जणांवर मधमाशांचा हल्ला

वेल्हे तालुक्यात उन्हाळी शिबिरासाठी आलेल्या दोनशे जणांना मधमाशांनी हल्ला....

अधिक वाचा

पुढे  

जयप्रभा स्टुडिओबाबत लता मंगेशकर यांना दिलासा
जयप्रभा स्टुडिओबाबत लता मंगेशकर यांना दिलासा

जयप्रभा स्टुडिओबाबत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाने केलेला दावा न्यायालया....

Read more